शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून जनतेने त्यांना घरी बसविले

By admin | Updated: October 21, 2015 21:43 IST

शंभूराज देसाई : पाटणकरांवर टीका; असा बेजबाबदार लोकप्रतिनिधी राज्यात सापडणार नाही

पाटण : ‘तालुक्याच्या एक जबाबदार आमदार म्हणून व्याघ्रप्रकल्पबाधित जनतेशी चर्चा करून त्यांना जशा हव्या तशाच हरकती दि. २२ जून रोजी व्याघ्र समितीचा सदस्य म्हणून सल्लागार समितीकडे पाठविल्या आहेत; पण पाटणकर पाच वर्षे केवळ झोपा काढल्या आणि आमदारकीच्या शेवटच्या वर्षात म्हणजे दि. २० आॅगस्ट २०१४ रोजी तुमच्या हरकती दिल्या. मग बेजबाबदार कोण मी का तुम्ही आणि तुम्ही २६ वर्षे बेजबाबदार वागलात म्हणून पाटणच्या जनतेने तुमच्यावरील राग व्यक्त करून तुमच्या पुत्राला १८,८२४ इतक्या मतांनी नाकारले म्हणजेच तुम्हाला घरी बसविले,’ असा प्रतिहल्ला आमदार शंभूराज देसाई यांनी केला.आमदार देसाई यांचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बेजबाबदार म्हणणारे पाटणकर किती निष्क्रिय लोकप्रतिनिधी होते, याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मी त्याचे राजकीय भांडवल करत नाही; मात्र व्याघ्र प्रकल्पबाबत खाली घेतलेल्या पाटणकरांना मी बेजबाबदार दिसत असेन, त्यांच्याऐवढा बेजबादार लोकप्रतिनिधी उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. व्याघ्रप्रकल्पातील केवळ बफर झोनमधीलच नाहीत, तर कोअर झोनमधील जाचक अटी आणि लादलेली बंधने रद्द करा आणि कोअर झोनमधील गावांचे पुनर्वसन करा. देसाई म्हणाले, याकरिता मी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्रप्रकल्प कोल्हापूर यांच्याकडे पाठविल्या आहेत. माझ्या तोंडी नको ती वक्तव्ये टाकून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कराल तर जनता सुज्ञ आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. (प्रतिनिधी)बफर झोनमध्ये ऐवढं काय दडलंय..शेवटच्या महिन्यात म्हणजे दि. २० आॅगस्ट २०१४ रोजी पाटणकरांनी हरकती दिल्या. त्यापूर्वी २००९ ते २०१४ या कालावधीत पाटणकर आमदार राहिले. मग या काळात काय केले? आणि पाटणकरांच्या केवळ ‘बफर झोन’संदर्भात हरकती आहेत. ‘कोअर झोन’च्या का नाहीत? मी दिलेल्या हरकतीमध्ये जनतेला यातून वगळा, पवनचक्की किंवा रिसॉर्ट मालकांना वगळा असा उल्लेख नाही, असे देसाई म्हणतात.