शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला गती, आतापर्यंत झाली 'इतकी' नोंदणी

By दीपक देशमुख | Updated: July 12, 2024 19:17 IST

सातारा : महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका यासाठी 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" ...

सातारा : महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका यासाठी 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी गतीने सुरू असून आतापर्यंत १ लाख १२ हजार ८४ महिलांची या योजनेसाठी नोंदणी करण्यात आले आहे.या योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तींची पुर्तता करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावेत तर शहरी भागातील अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, वार्ड अधिकारी, सेतु सुविधा केंद्र यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात या योजनेचे काम गतीने सुरू आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील सर्व घटक कसोशीने कार्यरत आहेत.या योजनेसाठी तहसील कार्यालयांतील सेतू केंद्रांवर गर्दी होऊून महिलांची ससेहोलपट होवू नये म्हणून अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच ॲपच्या माध्यमातून भरण्यात येतील, अशी यंत्रणा राबवली. त्यामुळे महिलांची नाेंदणी होण्याची काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत १ लाख १२ हजार ८४ महिलांची नोंदणी झाली आहे. सेतू कार्यालयामधील गर्दीही आता ओसरली आहे

या योजनेच्या पात्रतेचे निकषया योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणारे २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, अविवाहित असणे आवश्यक आहेत. यासाठी डोमासाईल, डोमासाईल नसल्यास १५ वर्षा पूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला यापैकी कोणताही एक रहिवाशी पुरावा आवश्यक आहे. आधार लिंक असणारे बँक खाते आवश्यक आहे. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे.

अपात्रतेचे निकषकुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे अपात्र राहतील. परंतु, बाहय यंत्रणाव्दारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. शासनाच्या इतर योजनांत दीड हजारांपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, कुटूंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी असल्यास (ट्रॅक्टर वगळून) लाभार्थी अपात्र ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomenमहिला