शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! एक कोटीच्या मांडूळाची तस्करी, तिघांना अटक; तिघेही रायगड जिल्ह्यातील

By दत्ता यादव | Updated: February 18, 2024 06:13 IST

दहा दिवसांपूर्वी सापडले शेतात

सातारा: तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची किंमत असलेल्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या तिघांना तळबीड, ता. कऱ्हाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई दि. १७ रोजी सायंकाळी करण्यात आली.

रुपेश अनिल साने (वय २५, रा. आड, ता. पोलादपूर, जि. रायगड), अनिकेत विजय उत्तेकर (वय २७), आनंद चंद्रकांत निकम (वय ३५, दोघेही रा. कापडखुर्दे, ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तळबीड पोलिस शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड सातारा रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी वराडे या गावामध्ये जय शिवराय या हाॅटेलजवळ काही लोक मांडूळ विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि पोलिस काॅन्स्टेबल नीलेश विभूते यांना मिळाली. त्यानंतर तळबीड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तातडीने सापळा लावला. काही वेळातच तेथे तिघेजण दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्याजवळ एक बाॅक्स होता. त्या बाॅक्सची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये मांडूळ आढळून आले. पोलिसांनी या तिघांकडे कसून चाैकशी केली असता त्यांनी हे मांडूळ आनंद चंद्रकांत निकम यांच्या शेतात काम करीत असताना दहा दिवसांपूर्वी सापडले असल्याचे सांगितले.

या मांडूळाची किंमत एक कोटी १० लाख रुपये ठरली असून, विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी कबुल केले. मात्र, कोणाला विकणार होते, हे अद्याप समोर आले नाही. कऱ्हाड येथील वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने जप्त केलेले मांडूळ देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, उप विभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस उपनिरीक्षक अशोक मदने, सहायक फाैजदार काळे, खराडे, पोलिस काॅन्स्टेबल आप्पा ओंबासे, संदेश दीक्षित, नीलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे आदींनी या कारवाई भाग घेतला.