शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

नदीकाठ ओरबाडला तस्करांनी...यातना भोगतायत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात नदीपात्र तसेच लगतच्या जमिनीतून वाळू, रेती यांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात नदीपात्र तसेच लगतच्या जमिनीतून वाळू, रेती यांचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे. गौण खनिज उत्खननाच्या लिलावात वरचढ बोली घेतली की, आपण नद्या ओरबडायला मोकळे, अशा अविर्भावात लिलाव घेणाऱ्यांनी जेसीबी, पोकलॅन फिरवून वाळू, रेतीचा उपसा केला. आता नदीकाठ ढासळत असल्याने नदीकाठावर पिढ्यानपिढ्या शेती करणारे शेतकरी यातना भोगताना दिसत आहेत.

सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा या प्रमुख नद्या तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्यात पूर्वी वाळू लिलाव होत होते; मात्र आता हरित लवादाच्या निर्बंधामुळे वाळू लिलाव थांबलेले आहेत. यापूर्वी नदीच्या पात्रातून वाळू उत्खनन होत असे. वाळू काढणारे यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडून घेत. आता याचा दुष्परिणाम जागोजागी पाहायला मिळतो. ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदलले आहे. पुराचे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसून शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे.

नदीपात्रात मोठी डबकी निर्माण झाल्याने स्थानिक जनतेलादेखील धोका निर्माण झाला आहे. नद्या ओलांडून शेतकरी आपल्या शेतामध्ये कामाला जात होते, मात्र आता नदीमध्ये मोठाले डबरे पडल्याने धोका वाढला आहे. नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

पॉइंटर

- सातारा जिल्ह्यात वाळू असलेल्या नद्या

कृष्णा, वेण्णा, कोयना, माणगंगा, नीरा, मांड - वसना वांगणा येरळा, तारळी (१२)

-जिल्ह्यात सध्या ६ वाळूच्या ठेक्यांची कार्यवाही सुरू

नदीपात्र पाण्याखाली

सातारा जिल्ह्यामध्ये यंदा मोठा पाऊस झाल्याने प्रत्येक नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू आहे. नदीपात्रातील वाळू लिलावावर बंदी आहे; मात्र पात्रालगतचे लिलाव होऊ शकतात. नदीपात्र देखील बहुतांश ठिकाणी पाण्याखाली आहे.

गेल्या पाच वर्षांत (२०१६ ते २०२०) वाळूचे एकूण ठेके आणि कंसात त्यातून मिळालेला महसूल

२०१६ : १३ ठेके (१६ कोटी ९८ लाख १२ हजार २८ रुपये)

२०१७ : २ (६ कोटी ९२ लाख १ हजार ७ रुपये)

२०१८ : १२ (५ कोटी १५ लाख ६३ हजार ९२३)

२०१९ : ०

२०२० : ६ (कार्यवाही सुरू आहे. पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्यानंतर याचा लिलाव होणार आहे)

वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय

सातारा जिल्ह्यात वाळूचे लिलाव होत नसल्याने क्रश सॅन्डचा वापर केला जात आहे. जिल्हयात क्रश सॅन्डचे १०० प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतून दिवसाकाठी ७००० ब्रास क्रश सॅन्ड तयार होते. सॅन्ड क्रश ४ हजार रुपये प्रतिब्रास या दराने विकली जात आहे, तर चोरीच्या वाळूचा दर १0 ते १२ हजार रुपये लावला जात आहे.

कोट..१

वाळू व रेती तस्करांनी नदीपात्रालगतच्या जमिनी खरवडून काढल्याने कसायला जमीन राहिलेली नाही. या जमिनीत बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करावी लागत आहे.

- राजू शेळके, शेतकरी

कोट २

पर्यावरण विभागाच्या मान्यतेशिवाय वाळू लिलाव आता केले जात नाहीत. सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षामध्ये ६ लिलाव करण्यात येणार आहेत, गौणखनिजाची चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचे काटेकोर लक्ष असून, धडक कारवायाही सुरू आहेत.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

कोट ३

नद्यांमधून तसेच पात्रालगतच्या जमिनींचे याआधीच मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे. नद्यांमधील जीव साखळी विस्कळीत झालेली आहे. ही जीव साखळी परस्पर पूरक काम करत असते. बेकायदा उत्खनन थांबले नाही, तर पर्यावरणाचे नुकसान कधीही भरुन येणार नाही. एखादी स्थानिक प्रजाती संपली, तर पुन्हा निर्माण होत नाही.

- डॉ. सुधीर कुंभार, पर्यावरण अभ्यासक

कोट ४

वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी क्रश सॅन्डचा वापर केला जातो. भविष्यात वाळू ही इतिहासजमा होईल. क्रश सॅन्डच्या माध्यमातून अगदी उत्तम बांधकाम केले जाऊ शकते. क्रश सॅन्ड आणि सिमेंटचा योग्य वापर केला, तर बांधकाम मजबूत होत आहे.

- मजीद कच्छी, कच्छी प्रॉपर्टीज

कोट ५

वाळूचे लिलाव होत नसल्याने क्रश सॅन्ड वापरली जात आहे. क्रश सॅन्डमध्ये ओलावा कमी असतो. त्यामुळे बांधकाम करताना सिमेंटचा वापर जास्त करावा लागतो. योग्य प्रमाणात क्रश सॅन्ड आणि सिमेंट यांचे मिश्रण केले, तर बांधकाम मजबूत होते.

- प्रशांत सावंत, इनोव्हेटिव्ह कंस्ट्रक्शन, सातारा

फोटो ओळ : सातारा तालुक्यातील अंगापूर येथे बेसुमार वाळू उपशामुळे कृष्णा नदीत ठिकठिकाणी डबकी निर्माण झाली आहेत. (छाया : संदीप कणसे)

फोटो नेम : ०२रिव्हर