शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

दिवसाढवळ्या लाल सोन्याची तस्करी!

By admin | Updated: May 23, 2015 00:33 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : कास तलाव परिसरातील कृत्रिम खड्ड्यांत साचतोय कचरा

पेट्री : साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कासचे जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झाल्याचा अभिमान बाळगला जातोय, पण त्याचे जनत करताना प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. कास तलाव परिसरातून दिवसाढवळ्या ‘लाल सोन्या’ची तस्करी केली जात आहे. यामुळे पडलेल्या कृत्रिम खड्ड्यांमध्ये कचरा साचत असल्याने तलावातील पाणी धोक्यात आले आहे.नैसर्गिक वारसा लाभलेल्या कास तलावाचे सौंदर्य लाल मातीमुळे उठून दिसत आहे. त्यामुळेच परिसरातील लाल मातीला जणू लाल सोन्याची उपमा दिली जाते. या मातीच्या गुणधर्मामुळे नारळ, आंबा, फणस, सुपारी आदींचे चांगले उत्पादन मिळत आहे. तसेच सुशोभीकरणासाठीही लाल मातीला मोठी मागणी आहे.मुबलक पाऊस, घनदाट झाडी, उंचसखल भाग यामुळे चित्रपटसृष्टीलाही भुरळ पडत असतानाच काही समाजकंठकांची दृष्ट लागायला लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलावालगतच्या जमिनीतील लाल मातीचे बेकायदेशीररीत्या उत्खनन केले जात आहे. यासाठी यंत्रांचाही वापर केला जात आहे. यामुळे तलाव परिसरात मोठ-मोठे खड्डे पडायला लागले आहेत.तलाव परिसरात वारंवार होत असलेल्या ओल्या, सुक्या पार्ट्या, मद्यपींनी टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, पत्रावळ्यांबरोबरच असंख्य अविघटनशील वस्तू टाकले जात आहेत. यामुळचे खड्ड्यांत कचऱ्याचे ढीग साठत आहेत. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. पावसाचे पाणी डोंगर उतारावरून तसेच खड्ड्यातील हा कचरा वाहून तलावातील पाण्यात मिसळला जाण्याची शक्यत आहे. यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास तलावही दूषित होण्याचा धोका वाढला आहे. परिसरात वेळोवेळी येणारे ट्रेकर्स, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी हा कचरा उचलतात. मात्र, पर्यावरणाच्या मुळावर उठलेल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पर्यावरण व महसूल विभागाने कडक पावले उचलावेत, अशी मागणी केली जात आहे. परिसरात फिरायला आल्यावर येथील रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. परंतु, खड्डे पडून तेथील मातीचे उत्खनन झाल्याने करवंद, जांभूळ यासारख्या कित्येक वनस्पतींची हानी होत आहे. या खड्ड्यांतील कचऱ्याची विल्हेवाट नाही लावली तर नैसर्गिक सौंदर्य हरवून नाही बसलो तरच नवल. (वार्ताहर)४पार्ट्या केल्यानंतर खड्ड्यात कचरा टाकला जातो. तर काही ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. परंतु, येथील उकरण्यात आलेल्या मातीचे काय? यासंबंधी प्रश्न अनुत्तरित आहेत. यासंदंर्भात वेळीच पावले नाही उचलले तर भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते.पाण्यात पडलेल्या बाटल्या, ग्लास, प्लेट व अन्य प्लास्टिक वस्तू, थर्माकॉलच्या तुकड्यांमुळे भविष्यात पाण्यात किडे, अळ्या होण्याचा धोका असतो. तलाव परिसरात चालत असलेल्या ओल्या पार्ट्या रोखण्यासाठी कडक पावले उचण्यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे.- मुकेश जाधव, पर्यटक, सातारा.