शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

म्हणे अंगण स्वच्छ करण्यासाठी फाशीच्या वडाची कत्तल !

By admin | Updated: July 29, 2016 23:25 IST

दोघांवर गुन्हा दाखल : अख्ख्या झाडावर घाव घातला

सातारा : म्हणे वडाच्या झाडामुळे अंगणात सातत्याने कचरा होत आहे. तसेच भविष्यात झाडाच्या मुळ्याही घरात येऊ शकतात. त्यामुळे एका व्यक्तीने या ऐतिहासिक फाशीच्या वडाची कत्तल केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर वडाची फांदी तारेला चिकटत असल्याचे कारण पुढे करत संबंधिताने अख्ख्या वडाच्या झाडावरच घाव घातला. त्यामुळे इतिहासप्रेमी संतप्त झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.ज्या व्यक्तीने या ऐतिहासिक फाशीच्या वडाची कत्तल केली. त्या व्यक्तीचे घर वडापासून साधरण ३० ते ४० फूट अंतरावर आहे. असे असताना त्या व्यक्तीने घरासमोर असलेल्या विजेच्या तारेला वडाच्या झाडाची फांदी लागत असल्याचे कारण पुढे केले. यावर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने असा प्रकार होत असेल तर एकच फांदी तोडा, असे त्या व्यक्तीला सांगितले. मात्र, हा तोंडी आदेश बासनात गुंडाळून संबंधिताने ऐतिहासिक फाशीच्या वडाची अक्षरश: खांडोळी के ली. हा सारा प्रकार उघड झाल्यानंतर इतिहासप्रेमी आणि सातारकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काहींनी थेट पालिकेत जाऊन यासंदर्भात जाब विचारला. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. वास्तविक वडाचे झाड तोडण्याची परवानगी पालिकेला नसते. असे असताना त्या कर्मचाऱ्याने कोणत्या अधिकाराद्वारे फाशीचा वड तोडण्याचा संबंधिताला आदेश दिला. हे इतिहासप्रेमींना समजेनासे झाले आहे. इतिहासप्रेमींनी याबाबत तक्रार केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. चौकशीत तत्य आढळल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.एकीकडे ऐतिहासिक ठेवा जिवापाड जपला जातो. मात्र, साताऱ्यामध्ये त्याला हरताळ फासला जात आहे. प्रशासनानेही संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी आता सातारकरांमधून होत आहे. (प्रतिनिधी)काय आहे फाशीच्या वडाचा इतिहास !१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी सहभाग घेतला होता. काही क्रांतिकारकांना साताऱ्यातील गेंडामाळावर वडाच्या झाडाला फाशी दिली गेली होती. जनतेमध्ये दहशत पसरावी, यासाठीच ही फाशी देण्यात आली होती. त्याच ऐतिहासिक स्थळ असणाऱ्या गेंडामाळावरील वडाची निर्घृणपणे कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक ठेवा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गुन्हा दाखल... ऐतिहासिक फाशीचा वड तोडल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय इनामदार आणि नीलेश इनामदार (रा. शाहूपुरी, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. ‘लोकमत’ व इतिहासप्रेमींनी यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.