शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांनंतर गायकवाडवाडीला एसटी

By admin | Updated: June 30, 2015 00:20 IST

ही सेवा कायमस्वरूपी टिकविण्यासाठी साठेवाडी, गायकवाडवाडी, घोलपवाडी, निगडी आदी गावांतील ग्रामस्थांनी सहकार्य करावे,

मसूर : ‘कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेकडील शेवटचे टोक असलेल्या गायकवाडवाडी येथे एसटी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून वारंवार होत होती. सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी या गावाला एसटी सुरू झाली आहे. ही सेवा कायमस्वरूपी टिकविण्यासाठी साठेवाडी, गायकवाडवाडी, घोलपवाडी, निगडी आदी गावांतील ग्रामस्थांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मानसिंगराव जगदाळे यांनी केले.गायकवाडवाडी, ता. कऱ्हाड येथे एसटीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजीराव जाधव होते. यावेळी कोरेगाव आगाराचे प्रमुख डी. एन. चव्हाण, वाहतूक नियंत्रक एन. जे. कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘गायकवाडवाडीला मसूर व वाठार या दोन प्रमुख बाजारपेठा जवळ आहेत. येथे जाण्यासाठी एसटीची सेवा सोयीची झाली आहे. यापुढेही परिसरातील जनतेच्या गैरसोयी सोडविण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार आहे.’आगारप्रमुख चव्हाण म्हणाले, ‘गावाला एसटी सुरू झाल्याने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी पास काढून विविध सवलतींचा फायदा घ्यावा. एसटी सुरू करण्याचे काम आम्ही केले असून, ते टिकविण्याचे काम तुम्हा सर्वांचे आहे.’ यावेळी दहावीत यश संपादन केलेल्या कीर्ती कदम, गौरी गायकवाड, रामचंद्र गायकवाड आदी विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास रामचंद्र गायकवाड, विठ्ठल गायकवाड, रमेश चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीरंग पवार यांनी स्वागत केले. माजी सरपंच संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. युवराज पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)