माणिक डोंगरे
मलकापूर : सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत असून, काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावांत केवळ १०८ रुग्ण सक्रिय राहिले आहेत. त्यापैकी दहा गावांत एक आकडी रुग्णसंख्या उरली असून, ती गावे कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. तर सहा गावांत सध्या एकही सक्रिय रुग्ण नसल्यामुळे ती सहा गावे कोरोनामुक्त झाली आहेत; मात्र मलकापूरसह कोयना वसाहतमध्येही कोरोनाचे रुग्ण घटले असले तरी तेथे दोन आकडी सक्रिय रुग्णसंख्या असल्यामुळे ही दोन्हीही गावे आजही हॉटस्पॉट ठरत आहेत.
काले प्राथमिक आरोग्य केंद्रांसह पाच उपकेंद्रांमार्फत मलकापूर शहरासह एकूण १८ गावांना आरोग्य सेवा दिली जाते. त्या गावामधील ७८ हजार एवढी लोकसंख्या आहे. आरोग्य मंत्रालय राज्य शासन यांनी लागू केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काले प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासह सर्व आरोग्यसेवा तत्परतेने दिल्या जातात. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डाॅ. तबस्सुम कागदी यांच्या अचूक नियोजनानुसार सर्व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गेल्या दीड वर्षापासून कोरोना विरोधातील लढा यशस्वीपणे सुरू आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत असून, काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावांत केवळ १०८ रुग्ण सक्रिय राहिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी मलकापूर ५७ व कोयना वसाहत २० अशी दोन आकडी रुग्ण सक्रिय असल्यामुळे ही दोन्हीही गावे आजही हॉटस्पॉट ठरत आहेत. तर दहा गावांत एक आकडी रुग्णसंख्या उरली असून, ती गावे कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. तर सहा गावांत सध्या एकही सक्रिय रुग्ण नसल्यामुळे ती सहा गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
(चौकट)
शून्य रुग्णसंख्या असलेली गावे...
जुजारवाडी, पेठ नांदगाव, नवीन नांदगाव, पवारवाडी, जाधवमळा, मुनावळे या सहा गावांत कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसल्यामुळे ती कोरोनामुक्त झाली आहेत.
(चौकट)
गावनिहाय सक्रिय रुग्ण
काले ७, चपणेमळा ५, संजयनगर १, भैरवनाथनगर ७, धोंडेवाडी १, नांदलापूर ३, जखीणवाडी २, कोयना वसाहत २०, आटके २, नारायणवाडी २, कालेटेक १, मलकापूर ५७,
(चौकट)
एकूण रुग्ण ५०९२
मृत्यू १८४
डिस्चार्ज ४८००
एकूण सक्रिय रुग्ण १०८
होम आयसोलेशन ७४
रुग्णालयात ३४
संस्थात्मक विलगीकरण ०
(कोट)
योग्य नियोजन व त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होत आहे. काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात लसीकरणावर भर दिला आहे. मलकापूर शहरात दोन लसीकरण केंद्रे सुरू आहेत. इतर गावातही आठवड्यात वार ठरवून लस देण्याचे नियोजन केले आहे. वरिष्ठ पातळीवरून पुरेशी लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.
डॉ. राजेंद्र यादव, वैद्यकीय अधिकारी