शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आणखी सहा पिस्तूल जप्त

By admin | Updated: June 19, 2016 00:48 IST

तिघांना अटक : आंतरराज्य टोळी सक्रिय; धागदोरे हाती

सांंगली : रिव्हॉल्व्हर तसेच पिस्तूल तस्करी व विक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या सांगलीतील टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी आणखी सहा पिस्तूल जप्त केली आहेत. टोळीतील आणखी तिघांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय आहे. यासंदर्भात महत्त्वाचे पुरावेही मिळाले आहेत. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, नव्याने अटक केलेल्यांमध्ये संतोष दत्तात्रय माळी (वय ३२, रा. विजय मराठा चौक, सांगलीवाडी), सुरेश बापूराव खोमणे (१९, कोराळे-खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) व गणेश नेमिनाथ घोडके (१९, पाण्याच्या टाकीजवळ, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. यापूर्वी अस्लम ऊर्फ सय्यदलाल सुतार, प्रशांत कोळी, सचिन चंदनशिवे, तौफीक शेख या चौघांना अटक केली होती. ते साखर कारखाना परिसर व माधवनगर परिसरातील आहेत. त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, चार पिस्तूल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी या तिघांची नावे निष्पन्न झाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सहा पिस्तूल सापडली. यातील एका पिस्तूलमधून एकावेळी १२ राऊंड झाडता येतात. शिंदे म्हणाले की, रिव्हॉल्व्हर तस्करी व विक्री करणारी ही टोळी मोठी आहे. यामागे आंतरराज्य टोळीचा हात आहे. त्यांना या शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य तस्कराचे नाव निष्पन्न झाले आहे. तो परराज्यातील आहे. त्याला पकडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पोलिसांचे एक पथक तपासासाठी पाठविले जाणार आहे. स्थानिक आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का, याची माहिती काढण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या टोळीकडून दहा पिस्तूल व एक रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. परराज्यातील तस्कर हाती लागला, तर तपासाला गती मिळेल. याचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त केलेल्या पिस्तुलाचा वापर झाला आहे का, याची तपासणी केली जात आहे. नरळे यांना बक्षीस शिंदे म्हणाले की, पिस्तूलची खरेदी व विक्री करणारी सांगलीत टोळी सक्रिय असल्याची माहिती सर्वप्रथम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस नाईक बिरोबा नरळे यांना मिळाली होती. त्यांच्या माहितीमुळे या टोळीचा पर्दाफाश करता आला. त्यामुळे त्यांना रोख दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. गुन्हेगारी आढावा बैठकीत त्यांचा बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला जाईल.