शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘पोलो’साठी सहा इंच मातीचा थर

By admin | Updated: February 8, 2016 23:49 IST

आज पुण्यात बैठक : महाबळेश्वरमधील मैदानाची वनविभागाकडून पाहणी

महाबळेश्वर : येथील पोलो मैदानावरील दगडांचा घोड्यांच्या खुरांना त्रास होऊ नये म्हणून सहा इंच जाडीची लाल माती टाकून त्यावर हिरवळ फुलविण्यात येणार आहे. पोलो खेळाच्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अंतिम आराखडा तयार करणे व स्पर्धांच्या आयोजनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ रोजी सायंकाळी साडेसात वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे. दरम्यान, सोमवारी या बैठकीच्या तयारीचा एक भाग म्हणून नगररचना विभाग, वन विभाग व पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पोलो मैदानाची पाहणी केली. या मैदानावरील राज्यपाल यांनी दिलेल्या आदेशानुसार महाबळेश्वर येथील पोलो मैदानावर उन्हाळी हंगामात पोलो खेळाच्या स्पर्धा भरवून महाबळेश्वर येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत विविध पातळीवर अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. मंगळवारी अशीच एक महत्त्वाची बैठक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पुणे आयुक्त कार्यालयात होत आहे. या बैठकीला वनविभाग, महसूल विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवन संरक्षक अंजनकर, पालकमंत्री विजयबापू शिवतारे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे इरिगेशन विभागाचे अधिकारी देशमुख वन विभागाचे वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी व पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी आज पोलो मैदानाची पाहणी केली. मैदानावर किती वृक्ष आहेत, खेळ सुरू असताना मैदानावर असलेले खडक कशा प्रकारचे आहेत व त्याचा घोड्यांना कितपत त्रास होईल आणि त्याबाबत काय उपाययोजना करता येतील या बाबतची सर्व माहिती तयार करण्यात आली आहे, ही माहिती बैठकीत सादर करण्यात येणार आहे. तसेच इतर कोणत्या अडचणी येतील याचा उहापोहही या बैठकीत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)खेळासाठी मैदानाच्या विस्ताराची गरज नाहीसध्या उपलब्ध असलेले पोलो मैदान पोलो खेळासाठी पुरेसे आहे. त्यामुळे आता त्या मैदानाचा विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही. मैदानाचा विस्तार होणारच नसल्याने वृक्षतोड या विषयावर या बैठकीत कोणतीही चर्चा होणार नाही, अशी माहिती वन विभागाचे वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिली. २.३४ हेक्टर क्षेत्र तयार करणारमहाबळेश्वर येथील पोलो मैदानावर एप्रिल २०१६ मध्ये प्रदर्शनीय पोलो सामने खेळण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या ३.६७ हेक्टर पोलो मैदानापैकी केवळ २.३४ हेक्टर क्षेत्रावरील दगड काढणे, माती टाकणे, गवत लावणे, पाणी व वीज याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या क्षेत्रावरील दगड काढण्याकरिता वन (संवर्धन) अधिनियम १९८० अंतर्गत परवानगी मिळण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे दि. ४ डिसेंबर २०१५ रोजी पत्राने विनंती केलेली आहे. याबाबतचा निर्णय अजून प्राप्त झाली नाही. निर्णय प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल.प्रस्तावित वनजमीन ही हेरिटेज समितीची मान्यता प्राप्त करण्याकरिता मुख्याधिकारी गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर यांनी हेरिटेज समिती अस्तित्वात नसल्याने संचालक नगररचना यांच्याकडे परवानगी प्राप्त करण्याकरिता प्रस्ताव सादर केलेला आहे. पोलो मैदान हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट असल्याने उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे.