शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

 कोयनेचे सहा दरवाजे एक फुटाने उघडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 13:45 IST

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाºया कोयना धरणात  पाण्याची आवक अधिक होत असल्याने सहा वक्र दरवाजे बुधवारी सकाळी एक फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामधून ९ हजार २९७ प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहही सुरू करण्यात आले आहे. तेथूनही पाण्याचा विसर्ग सुरू  झाल्याने नदीपात्रात एकूण ११ हजार ३९७ क्युसेक ...

ठळक मुद्देपायथा वीजगृहही सुरू नदीपात्रात ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात एकूण ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाºया कोयना धरणात  पाण्याची आवक अधिक होत असल्याने सहा वक्र दरवाजे बुधवारी सकाळी एक फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामधून ९ हजार २९७ प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहही सुरू करण्यात आले आहे. तेथूनही पाण्याचा विसर्ग सुरू  झाल्याने नदीपात्रात एकूण ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, अशी माहिती देण्यात आली. 

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. सध्या धरणात २० हजरांहून अधिक क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यातच धरणाची पाणीपातळी १०४.३० टीएमसी आहे.

धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी सकाळी सवा नऊच्या धरणाचे मुख्य सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्यामधून प्रति सेकंद ९ हजार २९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर सकाळी साडे दहाच्या सुमारास पायथा वीजगृहही सुरू करण्यात आले आहे.  या वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या नदीपात्रात दोन्ही ठिकाणचा मिळून ११ हजार ३९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

सध्या कोयना व परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे सायंकाळी आढावा घेऊन धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे कोयना धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.