शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 10, 2017 23:44 IST

सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात असणाऱ्या अंबवडे बुद्रुक या गावातील पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा उरमोडी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला, तर एका युवतीला वाचविण्यात यश आले. ही हृदद्रावक घटना बुधवारी दुपारी घडली. काजल सुरेश जाधव (वय १९), ऋतुजा सुरेश जाधव (१६) अशी बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. गेल्या काही वर्षांपासून जाधव कुटुंबीय ठाणे-मुंबई येथे स्थायिक झाले आहे. उन्हाळी सुटीनिमित्त या दोघी गावी आल्या होत्या. बुधवारी दुपारी या दोघींसह एकूण आठजण उरमोडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. पात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तीन मुली बुडू लागल्या; मात्र इतर काहीजणांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अंकिता जाधव (१५) या मुलीला वाचविले. मात्र, काजल आणि ऋतुजा पाण्यात बुडाल्या. या दोघींनाही पोहता येत नव्हते. बराचवेळ शोध घेतल्यानंतर दोघींना तत्काळ बाहेर काढले. त्यानंतर गावातील रिक्षाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडील ठाण्याहून गावी येण्यास निघाले आहेत. या दोघींना एक भाऊ असून, पे्रम जाधव (१०) असे त्याचे नाव आहे. काजल ही बारावीमध्ये तर ऋतुजा दहावीत शिकत होती. आत्तापर्यंत चौदाजण बुडाले!या उरमोडीच्या नदीपात्रात आत्तापर्यंत चौदाजण बुडाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समोर आले आहे. उरमोडीचे पात्र अंत्यत धोकादायक असून, भल्याभल्यांची याठिकाणी पोहताना दमछाक होत असते. हे पात्र धोकादायक असतानाही याठिकाणी कोणताही सर्तकतेचा फलक लावण्यात आला नाही. त्यामुळे अनेकांचा नाहक बळी जात आहे. प्रशासनाने तातडीने पाऊल उचलून फलक लावावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. वास्तुशांतीपूर्वीच घरात सन्नाटासुरेश जाधव यांनी लावंघर रस्त्यावर नवीन घर बांधले आहे. या घराची वास्तुशांती दि. १७ रोजी आहे. त्यामुळे ॠतुजा आणि काजल आई व भावासोबत काही दिवसांपूर्वीच गावी आल्या होत्या. नवीन घर बांधल्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. मात्र, घराची वास्तुशांती होण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे अंबवडे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.