शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सायरन वाजला की स्थानिक धावतात घाटाकडे!

By admin | Updated: April 19, 2015 00:39 IST

खंबाटकी घाट जीवघेणा : दरीत कसरत, प्रवाशांना उपचारास नेण्यासाठी धडपड

दशरथ ननावरे, खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाचा प्रवास म्हणजे प्रवाशांना जीवघेणा ठरत आहे. घाटातील सुविधांचा अभाव व महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, यामुळे घाटातला रस्ता बिकट वाटत आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे खंडाळा पोलीस स्टेशनसह स्थानिक ग्रामस्थांना दक्ष राहावे लागत आहे. या महामार्गावर कुठेही अपघात घडला की रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज ऐकून स्थानिक लोक घाटाकडे धाव घेत असतात. यात सर्वात पुढे असते. ते खंबाटकी मदत पथकातील सहकारी आणि मग सुरू होते. खंबाटकी घाटाच्या दरीतील कसरत, प्रवाशांचा जीव वाचविण्याची आणि त्यांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी त्यामुळे खंडाळा पारगाव ग्रामस्थ आणि खंबाटकीतील प्रवासी यांचं वेगळंच नातं रोज नव्या रूपाने पाहायला मिळते. महामार्गावर राजवत हॉटेलच्यासमोर शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने येणारी कार रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या कठड्याला जोरदारपणे धडकली. कारचा चक्काचूर झालेला. जीवाच्या आकांताने प्रवाशांची बाहेर येण्याची धडपड सुरू होती. पण पुढे यायला कोण तयार होईना; पण खंडाळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक शेळके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने पोहोचले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. क्रेनच्या साह्याने गाडी रस्त्यातून बाजूला काढून रस्त्यावरील सांडलेले डिझेल, काचा साफ करण्यासाठी रेस्क्यू टीमचे जवान रात्रीचेही काम करीत होते. तत्पूर्वी याच मार्गावर घाटाजवळ एका सायकलस्वाराला धडक बसल्याने तो जखमी अवस्थेत पडला होता. त्यासाठीही पोलिसांची धावाधाव सुरू होती. रात्रीच्या एक वाजेपर्यंत पोलिसांचे काम सुरूच होते. सकाळी आठच्या सुमारास पुन्हा खंबाटकी घाटात कार दीडशे फूट दरीत गेल्याचा निरोप. पुन्हा पोलिसांचा मोर्चा घाटाकडे. खंबाटकी मदत पथकाचे अध्यक्ष अजित यादव, युवराज ढमाळ, संतोष बावकर यांच्यासह सर्व एकवीस तरुणांची टीम मदतीसाठी धावल. खोल दरीत उतरून कारमधील लहान मुलांसह पती-पत्नीला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले; पण दरीतून कार काढणे मोठे जिकिरीचे काम. प्रत्येक वेळी हवालदार बाळू पवार हे मोठ्या निष्ठेने कार्य पार पाडतात. आजच्या अपघातातील कार कृष्णा क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. घाटाचा रस्ता, वळणे धोक्याची, महामार्गावर वाहनांची गर्दी त्यातूनही वाहतुकीची खोळंबा न करता सुरळीतपणे कार दरीतून काढण्यात आली. दिवसा उजेड असो किंवा रात्रीचा अंधार असो. पोलीस आणि मदत अपघातग्रस्तांना जीवदान देणारी ठरते. त्यामुळे हे काम अधिक महत्त्वाचे मानूनच सर्वजण काम करतात.