शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

सिद्धेवाडीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 15, 2015 00:45 IST

विषप्राशन : दहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; वडील प्रगतशील शेतकरी

सावळज : तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी येतील तरुण शेतकरी प्रदीप दगडू चव्हाण (वय २७) यांनी सोमवारी चव्हाण वस्ती येथील घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. प्रदीप यांचे वडील दगडू चव्हाण परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची १३ एकर शेती असून, त्यापैकी नऊ एकरवर शेवगा व तीन एकरवर द्राक्षबाग आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. प्रदीप चव्हाण आई, वडील, पत्नी, भाऊ व वहिनी यांच्यासह राहत होते. वडिलांना शेतीत मदत करत होते. शेतीतील अडचणीमुळे उत्पन्न कमी मिळत होते. त्यातच कर्जाचा डोंगर वाढल्याने आर्थिक विवंचनेतून प्रदीप यांनी सोमवारी विषारी द्रव्य प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र रस्त्यातच त्यांचे निधन झाले. प्रदीप चव्हाण यांचे १० महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून, लग्नाला वर्षही पूर्ण व्हायच्या आत घडलेल्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंधरवड्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या दि. ३ सप्टेंबर रोजी मणेराजुरी (ता. तासगाव) येथील किरण बाबासाहेब जमदाडे या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या घटनेला १५ दिवस झाले नाहीत तोच सिद्धेवाडीतील प्रदीप दगडू चव्हाण या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कर्जाचा ससेमिरा २००३-२००४ च्या दुष्काळामध्ये दगडू चव्हाण यांची द्राक्षबाग पाण्याअभावी जळून गेली होती. त्यानंतर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड केली. मात्र वातावरणामुळे त्यांना डाळिंबातून फारसे उत्पन्न न मिळाल्याने परत शेवगा व द्राक्षबाग लावली होती. दरम्यान शेतीसाठीचे कर्ज वाढतच गेले व अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने प्रदीप यांनी आत्महत्या केली.