शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

श्याम मनोहरना ‘साहित्य’; भावेंना ‘समाजकार्य’

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

महाराष्ट्र फौंडेशन : निखिल वागळेंना डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार

सातारा : अमेरिकास्थित महाराष्ट्र फौंडेशनचे ‘साहित्य’ आणि ‘समाजकार्य’ पुरस्कार जाहीर झाले असून, ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार पुणे येथील श्याम मनोहर, तर ‘समाजकार्य’ पुरस्कार मुंबई येथील पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसमवेत देण्यात येणाऱ्या अन्य पुरस्कारांचीही घोषणा झाली असून, याचे वितरण १० जानेवारी २०१५ रोजी पुणे येथील बालगंधर्व मंदिरात होणार आहेत.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी सातारा येथे पुरस्काराची घोषणा केली. दरम्यान, हे पुरस्कार अमेरिकेत स्थायिक मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फौंडेशनच्यावतीने देण्यात येत असले तरी त्याचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्ट करते. महाराष्ट्र फौंडेशनतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार पाच असून, ‘विशेष ग्रंथ पुरस्कार’ महाबळेश्वर सैल (गोवा) यांना ‘तांडव’ कादंबरीसाठी, ‘अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार’ अरुण खोपकर (मुंबई) यांना ‘चित्रव्यूह’ व ‘चलत् चित्रव्यूह’ जोडपुस्तकारसाठी, ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ पुस्तकासाठी, तर ‘रा. शं. दातार नाट्यपुरस्कार’ हिमांशू स्मार्त (कोल्हापूर) यांना ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या नाट्यलेखनासाठी जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)