शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

शाडूच्या मूर्तींबरोबरच स्वनिर्मितीचा श्रीगणेशा!

By admin | Updated: September 4, 2016 00:34 IST

‘लोकमत’ चळवळीला व्यापक स्वरूप : यंदा हजारो घरांमध्ये होणार बाप्पांच्या पर्यावरणपूरक मूर्र्तींची प्रतिष्ठापना

सातारा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘लोकमत’ने उभ्या केलेल्या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. हजारो सातारकरांनी यंदा थेट कुंभारांकडे शाडूच्या मूर्तींचे बुकिंग केले असून, शेकडो नागरिकांनी स्वत:च्या घरी मूर्ती निर्माण करण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. अनेकांनी संमती दर्शविली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्पर्धात्मक युगात शाडू मातीचे गणपती मिळणे दुर्मीळ आहे. यासाठी इनरव्हील क्लब आॅफ सातारा चॅम्प तर्फे भरविण्यात आलेल्या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्ती बनविण्याच्या एकदिवसीय शिबिरात वायसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बुद्धीचा देवता समजल्या जाणाऱ्या गणपती शाडूच्या मातीने तयार करून समाजासमोर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवात घरोघरी गणेशमूर्ती बसविण्याचे लगबग सर्वत्र सुरू आहे. नागरिकांना शाडू मातीचे गणपती उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने इनरव्हील क्लब आॅफ सातारा चॅम्पने एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६५ विद्यार्थ्यांसह १० शिक्षक, ५ महिलांचा सहभाग होता. या सर्वांनी मिळून आकर्षक अशा ७५ शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत. पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती कशी बनवितात, यासाठी हे शिबिर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली होती. एकूण या शिबिरात ६५ मूर्ती बनविण्यात आल्या. क्लबमार्फत पाच पोती शाडू मातीही उपलब्ध करून मूर्ती तयार केले. (प्रतिनिधी)एका गणपतीसाठी शंभर रुपयांचा खर्च... बाजारात मिळणाऱ्या किमती गणपतीपेक्षा स्वत: बनविलेल्या शाडू मातीचे गणपती तयार करण्यासाठी साधारणत: १०० रुपये खर्च येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी स्वत:च्या हाताने बनविलेल्या गणपती बसवू, असा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केली. इनरव्हील क्लबतर्फे नैसर्गिक रंग कसे वापरायचे याचेही प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी क्लबच्या मनीषा पाटील, लीना कदम, वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.शाडू मातीची तयार केलेला गणपती घरीच बादलीत विसर्जन करता येते. त्यातील रंग विरघळ्यानंतर माती तसीच राहते आणि त्या मातीचा वापरही झाडांबरोबर पुन्हा खेळणी वगैरे बनविण्यासाठी करता येतो. - गीता मामनिया, पीडीसी, इनरव्हील क्लब सातारा ‘लोकमत’च्या प्रबोधनाचे अभिनंदन मागील दोन वर्षांपासून ‘लोकमत’ पर्यावरणपूरक मूर्ती बसविण्याचे आवाहन केले होते. या माध्यमातून निसर्गावर होणाऱ्या परिणामांविषयी देखील प्रबोधन केले होते. त्यानंतर अनेक नागरिक शाडूमातीच्या मूर्तीची मागणी करू लागले असून, या दोन वर्षांत २०० वरून आता हजारावर ही संख्या पोहोचली आहे. तर अनेकजणांनी शाडूमातीचीच मूर्ती हवी असल्याचे सांगून बाजारात उपलब्ध करावी, अशी मागणीदेखील विक्रेत्यांकडे केली आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.