शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शुभमंगल @ बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:04 IST

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : विवाह म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लाऊन देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जातेय. इच्छूकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असून वाग्दत्त वराला मुलगी दाखविण्यापासुन ते अक्षता टाकण्यापर्यंतचे सगळे कार्यक्रम बनावट पद्धतीने उरकले जातायत.कºहाड तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचे एकापाठोपाठ ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : विवाह म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लाऊन देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जातेय. इच्छूकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असून वाग्दत्त वराला मुलगी दाखविण्यापासुन ते अक्षता टाकण्यापर्यंतचे सगळे कार्यक्रम बनावट पद्धतीने उरकले जातायत.कºहाड तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचे एकापाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाले. लग्न लाऊन देण्याच्या नावाखाली काही जणांनी फसवणूक केल्याचे नवरदेवांचे म्हणणे आहे. संबंधितांनी पोलिसांना विवाहाची जी ‘स्टोरी’ सांगीतली, तीही एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी आहे. बनावट लग्नाच्या या कथानकाला विवाह इच्छूक सावज शोधण्यापासुनच सुरूवात होते. ज्यांची लग्न रखडली आहेत, असे युवक शोधून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीत कºहाड तालुक्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीजणांचा सहभाग आहे. ज्यांना विवाह करायचा आहे, असे युवक शोधून हे संशयीत त्यांना तात्काळ लग्न लाऊन देण्याचे अमिष दाखवतात. सांगली किंवा कोल्हापुरला नेऊन त्याठिकाणी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रमही पार पाडला जातो. पसंती झाल्यानंतर विवाह लाऊन देण्यासाठी लाखोत रक्कम सांगीतली जाते. तसेच मुलीची परिस्थिती नसल्याने तिला दागिने घालण्यासही सांगण्यात येते. एवढे दिवस रखडलेले लग्न होऊ घातल्याने इच्छूक वरही पैसे आणि दागिने देण्यास तयार होतात. वराकडून पैसे मिळाल्यानंतर त्याचठिकाणी अथवा आसपासच्या मंदिरात वधु-वराला हार घालण्याचा आणि अक्षदा टाकण्याचा कार्यक्रम घेतला जातो. हा बनावट विवाह पार पडताच वराकडून ही टोळी पैसे उकळते. त्यानंतर दोनच दिवसात फिरायला जाण्याचा बहाणा करीत नववधु आपल्या पतीला परगावी घेऊन जाते. आणि तेथुनच त्याची नजर चुकवून ती दागिन्यांसह पसार होते.फसवणुकीत महिलांचाही सहभागकºहाड तालुका पोलीस ठाण्यात १५ जानेवारी २०१८ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात इचलकरंजी येथील एका महिलेचा समावेश आहे. तसेच त्यावेळीही इच्छूक वराला एक युवती दाखविण्यात आली होती. जी लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी पळून गेली. तर फसवणुकीची दुसरी फिर्याद २२ मार्च रोजी दाखल झाली. फिर्याद देणाºया संबंधित युवकालाही कोल्हापुरात आरती नावाच्या युवतीला भेटविण्यात आले होते. तसेच तिच्यासोबत त्याचा विवाहही लाऊन देण्यात आला होता.लग्नासाठी इच्छुकाने जमिनही विकलीलग्नाच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याची तक्रार देणाºया एका इच्छूक वराने विवाहासाठी जमिन विकल्याचा प्रकारही पोलीस तपासातून समोर आला आहे. जमिन विकून मिळालेले पैसे त्याने विवाह ठरविणाºयांना दिले होते. तसेच त्याच पैशातून त्याने आपल्या होणाºया पत्नीला दागिनेही खरेदी केले होते. मात्र, पैसे घेऊन संबंधित व्यक्ती तसेच विवाहानंतर दागिने घेऊन संबंधित युवती पसार झाली आहे.