शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामांचे ‘ड्रोन’मधून चित्रीकरण!

By admin | Updated: January 22, 2017 23:37 IST

यशोगाथा पुस्तक रुपात : क्यू आर कोडच्या संकल्पनेतून मोबाईलवरही चित्रफित

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला सातारा जिल्ह्यात प्रचंड मोठे यश आले आहे. लोकसहभागातून झालेल्या या कामांची यशोगाथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने यशोगाथा सांगणारे पुस्तक प्रसिद्ध केले असून, या पुस्तकात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जलयुक्त शिवार कामांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या कामाच्या माध्यमातून १.३ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण केला आहे. याचा सविस्तर आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. प्रशासकीय उपक्रम, जलसंधारण, विविध उपचार, भरलं शिवार आणि तांत्रिक माहिती अशा चार विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या यशस्वी कामांची माहिती या पुस्तकामध्ये सचित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासकीय उपक्रमामध्ये प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रक्रिया, अभियान, प्रत्यक्ष श्रमदान याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जलसंधारण विविध उपचारांमध्ये यांत्रिकी विभागाने केलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. भरलं शिवार या विभागात या अभियानाचा दृश्य परिणाम पाहायला मिळतो. विविध गावांच्या यशोगाथांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. तांत्रिक माहिती या शेवटच्या विभागात जलसंधारणांच्या विविध उपचारांची तांत्रिक माहिती देण्यात आली आहे. या चारही विभागांच्या माध्यमातून अपेक्षित समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जलसंधारण विभागाचे तत्कालीन सचिव प्रभाकर देशमुख, सचिव आबासाहेब जऱ्हाड, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या यशोगाथेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण, ग्रामविकास विभागाचे उपसचिव वैभव राजेघाडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले यांच्या सहकार्याने ही पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)काय आहे क्यू आर कोड ?जलयुक्तचे काम छायाचित्रांसोबतच चित्रफितीच्या माध्यमातून पाहता यावे, म्हणून ‘क्यू आर कोड (क्विक रिस्पाँस कोड)’ चा वापर या पुस्तकात प्रामुख्याने करण्यात आला आहे. क्यू आर कोडची संकल्पना शासकीय प्रकाशनामध्ये राबविणारे राज्यात बहुधा हे एकमेव पुस्तक ठरेल. क्यू आर कोड रिडरच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईलवर झालेल्या कामांची चित्रफितही पाहू शकता, हे या पुस्तकाचे प्रमुख आकर्षण आणि वेगळेपण आहे.