शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

‘श्रीं’च्या आधी श्रीफळाचे आगमन

By admin | Updated: August 27, 2014 23:31 IST

दर वाढले : आगामी काळात आवक आणखी वाढण्याची चिन्हे; ‘चारपट्टा’ला मागणी

सचिन काकडे - सातारा  -दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नारळांची आवक हळूहळू वाढत चालली आहे. उत्सवकाळात नारळाला मोठी मागणी असल्याने काही दिवसांत आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सण, सभारंभात तसेच धार्मिक कार्यासाठी एरवी नारळांची विक्री होतच असते; परंतु गणेशोत्सव व नवरात्रीत नारळाला विशेष महत्त्व प्राप्त होते. दरवर्षी जिल्ह्यामध्ये नारळाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. २९ आॅगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जिल्ह्यात नारळांची आवक हळूहळू वाढत चालली आहे. जिल्ह्यात राज्यासह आंधप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणांहून नारळाची आवक होते.गणेशोत्सव काळात नारळापासून मोदकासह विविध खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांपासून गणेशमंडळांपर्यंत सर्वांकडून नारळाची मागणी होत असते. गणरायाला अर्पण करण्यासाठी देखील नागरिकांतून नारळाची मागणी होत असेत. घरगुती वापरासाठी देखील नारळाचा सतत उपयोग होत असतो. त्यामुळे उत्सवकाळात नारळाची सर्वाधिक आवक होते असते. केवळ सातारा शहरामध्ये उत्सवकाळात २० ट्रक नारळाची विक्री होते. एका ट्रकमध्ये लहान-मोठे सुमारे १२ ते १३ हजार नारळ असतात. दरवर्षी हे प्रमाण बदलत असते. सध्या नारळाच्या किमती वाढल्या असून, याच्या विक्रीवर काही अंशी परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.