शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खासदार अन् कार्यकर्त्यांना जागा दाखवू

By admin | Updated: February 1, 2017 23:18 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : वेचले येथील मेळाव्यात आव्हान; दहशतीला जशासे तसे उत्तर देणार

शेंद्रे : ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत खासदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीला न घाबरता घरी बसवून त्यांची त्यांना जागा दाखवून द्यावी. इथून पुढे विरोधकांच्या दहशतीला जशास तसे उत्तर देण्यात येईल, याची दखल आता विरोधकांनी घ्यावीच,’ असे आव्हान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. वेचले, ता. सातारा येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शेंदे्र गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याचे संयोजन बाबाराजे युवा विचारमंच व सरपंच अनिल देशमुख यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘येणारी निवडणूक ही सातारा तालुक्याचे राजकारण ठरविणारी ठरणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागावे. मनोमिलन कोणामुळे तुटले आहे ते जनतेला माहीत आहे. शेंद्रे गटात भाऊसाहेब महाराजांपासून आपल्याच गटाचे प्राबल्य आहे. परंतु मनोमिलनात गट त्यांच्याकडे दोन पंचवार्षिकदिला. त्यामुळे शेंद्रे गटातील आपल्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व खुंटले. त्याला मी जबाबदार आहे.’दिवंगत भाऊसाहेब महाराजांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात सातारा तालुक्याला किंमत आली. राजकारणात आपण पक्षाशी कायम प्रामाणिक राहिलो आहे. राजकारणातील असणारी तत्व पाळत आलो आहोत. त्यामुळे आता जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे निर्णय अजिंक्यताऱ्यावर बैठक घेऊन घेण्यात येतात. तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. जो निर्णय होईल तो मान्य करावा.’ यावेळी सरपंच अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते नाना चव्हाण, भोसले, लालासाहेब पवार आदींची मनोगते झाली. यावेळी सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, लालासाहेब पवार, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, प्रा. शिवाजीराव चव्हाण नाना चव्हाण, वेचले ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, उपस्थित होते. (वार्ताहर)