शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

दारूवाला दाखवा..गल्लीतून हद्दपार करू !

By admin | Updated: April 12, 2016 00:45 IST

नगराध्यक्षांचं ओपन चॅलेंज : ‘माहिती’च्या नावाखाली स्वयंघोषित समाजसेवकांचा धुमाकूळ; भालचंद्र निकम, स्वाती आंबेकर यांचा आरोप

सातारा : ‘नगराध्यक्षाच्या निवडीसाठी केवळ एकमेव माझाच अर्ज आला होता. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी निवडीपूर्वीच फ्लेक्स झळकविले. यात गैर काय? आपण कार्यकर्त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही,’ अशा शब्दांत नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी आपल्यावरील ‘प्रोटोकॉल’ मोडल्याच्या आरोपाचा समाचार घेतला. दरम्यान, ‘वॉर्डमध्ये काम करत असताना ‘आरटीआय’च्या नावाखाली स्वयंघोषित समाजसेवक विकासकामात हस्तक्षेप करतात. याचा सर्वांनाच त्रास होत असल्याची खंत नगरसेविका स्वाती आंबेकर आणि भालचंद्र निकम यांनी व्यक्त केली.‘लोकमत आपल्या प्रभागात’ उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक सातचा दौरा केल्यानंतर ‘लोकमत’ कार्यालयात या प्रभागातील चार नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांसह राजकीय विषयांवर आणि त्यांच्यावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांवर मनमोकळे भाष्य केले. नगराध्यक्ष विजय बडेकर, भालचंद्र निकम, हेमा तपासे यांच्यासह स्वाती आंबेकर यावेळी उपस्थित होत्या. ‘नगराध्यक्ष झाल्यापासून २० टक्केही कामे झाली नाहीत. नगराध्यक्ष होण्यापूर्वीच आपण फ्लेक्स झळकविलेत, असा आरोप तुमच्यावर केला जातोय,’ याकडे लक्ष वेधले असता नगराध्यक्ष विजय बडेकर म्हणाले, ‘ पहिल्या पाच वर्षांत पाच लाखांचा निधी मिळाला. त्यानंतर निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तरीसुद्धा वॉर्डामधील रस्ते आणि पेव्हर ब्लॉकची कामे झाली आहेत. आणखी काही मोठी कामे प्रस्तावित आहेत. तेही लवकरच होतील. निवड जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फ्लेस लावले तर यात गैर काय? सर्वसामान्यांसाठी कस्तुरबा रुग्णालयाच्या नव्याने उभारणीचे काम हाती घेतले. सयाजी विद्यालयासमोर शॉपिंग सेंटर उभारून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. भालचंद्र निकम हे दिवसभर पालिकेत तळ ठोकून असतात, याविषयी मत विचारले असता, निकम म्हणाले, ‘मी राहतो तो भागच पालिकेत येत आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ मी पालिकेत फेरफटका मारतोच. लोकांची कामे करायची म्हटले तर पालिकेत जावेच लागते.’तुम्ही पालिकेच्या सभेमध्ये एकदाही बोलत नाही, असा आक्षेप तुमच्यावर आहे, असे हेमा तपासे यांना सांगितले असता, त्या म्हणाल्या, ‘पालिकेत नाही बोलले; पण प्रभागात बोलते. बोलायची सवय नव्हती; पण आता यापुढे बोलणार.’तुम्ही पालिकेत बोलत नाही, तुमचे पतीच बोलत असतात. तुम्ही सध्या नगरसेविका असला तरी तुमचे पती श्रीकांत आंबेकर हेच पालिकेत नगरसेवक म्हणून वावरत असतात. एवढेच नव्हे तर सर्व विकासकामे मीच केली, असाही दावा ते करतात, असे बोलले जाते, यावर तुमचे मत काय?, असे स्वाती आंबेकर यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘असं नाही. माझी बोलायची इच्छा असते; मात्र माझ्या तोंडून एखाद्या वाक्याचा विपर्यास झाला तर याची धास्ती वाटते. म्हणून पालिकेत बोलत नाही.’‘आंबेकर नगरसेवक होते. त्यामुळे लोक त्यांच्याकडेच काही कामे असतील तर सांगतात, त्यात गैर काय? त्यांच्या नावाने विकासकामे झालेली ओळखलीत तरी मला काही वाटत नाही,’ असेही त्या म्हणाल्या.‘नागरिकांनीही आपले कर्तव्य म्हणून नगरसेवकांना भेटून कामे सांगावीत,’ असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. (लोकमत चमू)निवडणूक बिनविरोध नकोच...$$्र्रिप्रभाग क्रमांक सातमध्ये आगामी पालिकेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे ‘लोकमत टीम’ला स्पष्टपणे जाणवले. गेल्या वेळची निवडणूक बिनविरोध झाली नव्हती अन् आताही होणार नाही, असे अनेकांनी ठामपणे सांगितले. यावर नगराध्यक्ष विजय बडेकर म्हणाले, ‘बिनविरोध नकोच. निवडणूक व्हायलाच पाहिजे. त्यामुळे लोकांशी संपर्क वाढतो.’ बडेकर यांचे समर्थन करत भालचंद्र निकम यांनीही बिनविरोधची री ओढली. त्यामुळे यंदा पालिकेच्या निवडणुकीत इथे चुरस पाहायला मिळणार, हे नक्की.तेव्हाचे लोकप्रतिनिधी कुठे होते ?सयाजीराव शाळेसमोरील एक स्टेशनरीचे दुकान पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने जमीनदोस्त केले आहे. मात्र, त्याच्या शेजारी असणाऱ्या दुकानदाराला अभय मिळत आहे. यावर स्वाती आंबेकर एकदम उसळून म्हणाल्या, ‘संबंधिताविरोधात तक्रार आली तर नक्कीच त्यांच्यावरही कारवाई करू; मात्र जेव्हा हे अतिक्रमण काढले, तेव्हाचे लोकप्रतिनिधी कुठे गेले होते. तेव्हा का आवाज उठविला गेला नाही. मग आत्ताच का?’