शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या जागेवर दुकानदारांचे ‘पोट’भाडेकरू

By admin | Updated: December 3, 2015 23:47 IST

हॉकर्सची हतबलता : उदरनिर्वाहासाठी छोटा व्यवसाय करणाऱ्यांना गिळतायत काठावरचे मोठे मासे

दत्ता यादव - सातारा सातारा : उन्हातान्हात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपता संपेनासे झाले आहे. पोलिसांच्या कारवाईचा बडगा सुरू असतानाच आता दुकानदारांच्या मनमानीपुढे उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे व्यवसाय करणारे विक्रेते अक्षरश: हतबल झाले असून, पालिकेच्या जागेवरच दुकानदारांनी चक्क ‘पोट’भाडेकरू ठेवल्याचे समोर आले आहे.शहरात इनमीन राजपथ आणि कर्मवीरपथ हे दोन मुख्य रस्ते आहेत. हे दोन रस्ते रहदारीचे असल्यामुळे या रस्त्यावर अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी आपला व्यवसाय थाटला आहे. गाळा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू करणे, अशा विक्रेत्यांना न परवडणारे असते. त्यामुळे रस्त्यावर बसून व्यवसाय करणे, हे विक्रेते पसंत करत असतात. मात्र, रस्त्यावरही आता विक्रेत्यांना जागा मिळेनासी झाली आहे. जागा मिळालीच तर ज्या दुकानासमोर विक्रेते बसत आहेत. त्या दुकानदाराला महिन्याला भाड्यापोटी पाच ते सात हजार रुपये द्यावे लागत आहेत. शिवाय पालिकेची दिवसाची पावती सुमारे २५ रुपये फाडावी लागत आहे. अशा प्रकारे या हॉकर्सना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. पालिकेच्या जागेवरच दुकानदारांनी ‘पोट’भाडेकरू ठेवल्याने काठारचे मासे मोठे झाले आहेत. तर हतबल झालेले हॉकर्स मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.जर ‘पोट’भाडेकरू विरोधात आवाज उठवलाच तर मग दुकानासमोर बसू दिले जाणार नाही, याचीही विक्रेत्यांना धास्ती वाटतेय. त्यामुळे गपगुमानं दुकानदारही खूश आणि पालिकाही खूश ठेवण्याचा विक्रेते खटाटोप करत आहेत. काही ठिकाणी दुकानापेक्षा रस्त्यावर चांगला व्यवसाय होत असतो. त्यामुळे दुकानदाराला रस्त्यावर बसण्याचे भाडे दिले तरी चालेल, अशीही काही विक्रेत्यांची मानसिकता झाली आहे.