शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगसाठी दुकानदारांचा कऱ्हाडात मोर्चा

By admin | Updated: February 10, 2015 23:57 IST

हजारोंचा सहभाग : दुकानदारांसह लाभधारक महिलांची लक्षणीय उपस्थिती

कऱ्हाड : ‘आमच्या मागण्या पूर्ण करा; रॉकेल-धान्य चालू करा’ अशी घोषणाबाजी करीत रॉकेलची रोख सबसिडी तत्काळ रद्द करून बायोमेट्रीक पध्दत बंद करावी, अशा अकरा मागण्यांसाठी मंगळवारी कऱ्हाड येथे स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रे ते संघटनतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह हजारो लाभधारक नागरिक सहभागी झाले होते. आॅल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व पुण्यातील रॉकेल परवानाधारक महासंघ व कऱ्हाड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसह तालुक्यातील गावागावातून आलेल्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पंचायत समितीपासून सकाळी ११.३० वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. दत्तचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा दत्त चौकातून भेदा चौकात व तेथून स्थलांतरित झालेल्या मार्केट यार्डमधील तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. संघटनेचे राज्याध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब तोडकरी, तालुका अध्यक्ष व मोर्चाचे मुख्य संयोजक अशोकराव पाटील, उपाध्यक्ष के.एम.पवार, खजिनदार सुरेश पाटील, शंकर रामुगडे, तुकाराम देसाई, सचिन इनामदार, प्रदीप शिर्के, वि. तु. सुकरे, बाळासाहेब पाटील आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.स्वस्त धान्य व रॉकेल विक्रेता संघटनेतर्फे निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांना एकूण १३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रतिव्यक्ती रॉकेल कोटा २ लिटर मिळावा, शुभ्र कार्डधारकांना रॉकेल दिले जावे, रेशनकार्डवरील अनुदानाबदल्यात धान्य मिळावे, शासनाने रेशन धान्य दुकानामध्ये बसविण्यात येणारी बायोमेट्रीक पद्धतीचे यंत्र बंद करावे, २ गॅस सिलिंडर धारकांना रॉकेल दिले जावे, रेशनकार्डवरील साखर, पामतेल, डाळ, गहू, तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, बी. पी. एल. व अंत्योदय कार्डवरील धान्य सुरू करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये केले जाणारे बदल याविषयी जनतेला माहिती देण्यात यावी, अशा मागण्या संघटनेद्वारे करण्यात आल्या.यावेळी तालुकाध्यक्ष अशोक पाटील म्हणाले, ‘शासन कोणतेही असो परंतु जनतेचा आवाज हा त्या शासनाला जागे केल्याशिवाय राहत नाही. या मोर्चातून सामान्य जनतेसाठी मोठा लढा उभा केला आहे. तो तसाच पुढे चालू ठेवणार आहे.’ (प्रतिनिधी)राज्यकर्त्यांनाच अच्छे दिनपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिन आणतो, असे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या भुलभुलैय्याला भुलून सर्वांनी त्यांना निवडून दिले. मात्र, आता त्यांचेच अच्छे दिन आले असून आपल्याला बुरे दिन पाहायला मिळत आहेत, असे आप्पासाहेब गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले.रणरागिणींचा आक्रमकपणाग्रामिण भागातील महिलांनी रेशनिंग धान्याबाबत आज आक्रमक पवित्रा घेतला होता. रानात मजुरीसाठी जाणाऱ्या महिला आज मात्र प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले. या महिलांनी शासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.