शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख उसनवार घेऊन दुकानदाराची फसवणूक

By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST

‘आमचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे परत करतो,’ असे सांगिल्यामुळे दबडे यांनी सुरुवातीला तीन लाखांचा धनादेश मालन खोचे यांच्या नावावर दिला.

सातारा : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उसनवार म्हणून घेतलीली पाच लाखांची रक्कम परत केली नाही. या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.महेश रमेश रसाळ (रा. नागपूर), मालन भास्कर खोचे ऊर्फ मालन उमेश कुदळे, उमेश नारायण कुदळे, युवराज नारायण कुदळे, धनराज नारायण कुदळे, जयराज नारायण कुदळे (सर्व रा. केसरकर पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.संतोष शिवाजी दबडे (वय ३८, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांचे मंगळवार पेठेमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाशेजारी महेश रसाळ याचे दुकान आहे. त्यामुळे दोघांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. महेश रसाळ याने सासरे उमेश कुदळे, पत्नी मालन कुदळे यांची दबडे यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर कुदळे यांचे दबडे यांच्या दुकानात येणे-जाणे सुरू झाले. उमेश कुदळे यांची मुले युवराज व धनराज यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी दबडे यांच्याकडे पाच लाख उसने पैसे मागितले. मात्र, एवढे पैसे नसल्याचे सांगूनही कुदळे यांनी दबडे यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली. ‘आमचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे परत करतो,’ असे सांगिल्यामुळे दबडे यांनी सुरुवातीला तीन लाखांचा धनादेश मालन खोचे यांच्या नावावर दिला. त्यांनी तो धनादेश स्टेट बँकेमध्ये जमा केला. काही दिवसांनंतर पुन्हा दबडे यांच्याकडे कुदळे यांनी पैसे मागितले. तुम्ही आणखी दोन लाख दिले तर नवीन व्यवसाय सुरू करता येईल, अन्यथा तुम्ही दिलेले पैसेही मुदतीत तुम्हाला परत करता येणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे दबडे यांनी पुन्हा दोन लाखांचा धनादेश दिला. असे एकूण पाच लाख रुपये कुदळे यांना उसने देण्यात आले.सहा महिन्यांनंतर दबडे यांनी त्यांना पैसे मागितले असता, कुदळे यांनी ‘खासगी सावकारी केल्याची पोलिसांकडे तक्रार करेन,’ अशी त्यांना धमकी दिली. त्यामुळे दबडे यांनी या सर्वांच्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाची पोलिसांनी प्राथमिक सत्यता पडताळल्यानंतर कुदळे कुटुंबावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार पवार अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)