विद्यानगर : येथील एमएसईबी कॉलनीमध्ये बंद अवस्थेतील लोखंडी पत्र्याच्या दुकानाला आग लागली. या दुर्घटनेत सुमारे साठ हजारांचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी अकाराच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एमएसईबी कॉलनीमध्ये बंद अवस्थेतील पत्र्याचे दुकान आहे. सकाळी अचानक या दुकानाने पेट घेतला. घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.
विद्यानगरमध्ये दुकान जळाले
By admin | Updated: February 8, 2015 00:52 IST