तीन हजार ५०० रुपये दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानांसह इतर ठिकाणांच्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी एका दुकानदाराने वारंवार नियम मोडल्याने त्याचे दुकान सील करण्यात आले. संबंधित दुकानदारांकडून साडेतीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी गर्दीची चाहूल लागताच शहरात फिरून कारवाईची धडक मोहीम राबवली. जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. १ जूनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही शहरातील काही दुकानांमध्ये नियमांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याची बाब निदर्शनास आली, तर काहीजण रस्त्यांवर राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले.
याविरोधात संयुक्त पथकाने शहरात कारवाईची मोहीम राबवली. जीवनावश्यक वस्तूव्यतिरिक्त दुकानाचे शटर बंद; पण नियम मोडून मालाची विक्री करत असलेल्या पाच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून तीन हजार ५०० रुपये दंडही वसूल केला. त्यापैकी एका दुकानदाराने दुसऱ्यांदा नियम मोडल्यामुळे त्याचे दुकान पोलीस व पालिका प्रशासनाने सील केले. या कारवाईत दिवसभरात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक राजेश काळे, निकम, बाजीराव येडगे, नीलेश पाटील, वैभव आरणे, सुभाष बागल, तेजस शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी तानाजी बागल कारवाईत सहभागी झाले होते.
चौकट
दारू विक्रेत्यांकडून उल्लंघन
ढेबेवाडी रस्त्यालगत असलेल्या दारूच्या दुकानात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याची बाब पालिकेचे अधिकारी राजेश काळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गुरुवारी दुपारी तेथे जाऊन कारवाई केली. त्यावेळी संबंधित दुकानदाराने पालिकेच्या पथकाबरोबर हुज्जत घातली. ‘तुम्हाला कारवाईचा काय अधिकार? बेकायदेशीर दुकानांवर कारवाई करताय तर मग तिकडे जाऊन ही कारवाई करा,’ असे म्हणून कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर दुकानाबाहेर ठेवलेले दारूचे बॉक्स पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठांच्या आदेशानुसार दुकान सील करून संबंधित मालकाला तीन हजार रुपयांचा दंड केला आहे.
शिवछावा चौकात पोलीस आक्रमक; १५ दुचाकी ताब्यात
ब्रेक द चेन हा शासनाने पंधरा दिवसांचा अंशतः लॉकडाऊन केला आहे. कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीकरिता मलकापुरात पोलीस आक्रमक झाले होते. पोलिसांच्या पथकाने गुरुवारी कारवाईची धडक मोहीम राबविली. पोलिसांनी येथील शिवछावा चौकात वाहनांसह नागरिकांची कसून चौकशी करत विनाकारण फिरणाऱ्यांच्या १५ दुचाकी ताब्यात घेतल्या.
फोटो २०मलकापूर दारू
मलकापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत दारू विक्री करणाऱ्या दुकानावर नगरपालिका व कऱ्हाड शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी कारवाई करून दारू जप्त केली. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
200521\img_20210520_155101.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
मलकापूरात पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने गुरूवारी ५ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी विनाकारण फिरणारांच्या ११ दुचाकी जप्त केल्या. (छाया-माणिक डोंगरे)