शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलमध्ये ‘शॉक ट्रिटमेंट’.. तंबाखू खाताच शंभरची पावती

By admin | Updated: July 16, 2017 00:18 IST

व्यसनमुक्तीसाठी प्रशासन आक्रमक : नातेवाइकांसोबत रुग्णही आढळले नियम मोडताना; आजपर्यंत चाळीसपेक्षाही जास्त नागरिकांवर दंडाची कारवाई

दत्ता यादव ।  qलोकमत न्यूज नेटवर्क सातारा : व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीही केली जाते; परंतु म्हणावा तेवढा परिणाम होतोच असे नाही. यावर पर्याय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालय व परिसरात तंबाखू खाताना आढळल्यास ‘शॉक ट्रिटमेंट’ देत शंभर रुपयांची पावती हातात देण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे व्यसनमुक्तीचा हेतू यशस्वीतेचे एक पाऊल पुढे टाकत आहे.दरवर्षी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये तंबाखू न खाण्याबाबत प्रबोधन केले जाते. मात्र, नुसतीच जनजागृती करून लोकांमध्ये फारसा बदल होत नसल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय अखेर रुग्णालय प्रशासनाने घेतला.जिल्हा रुग्णालय आवारात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला माने, डॉ. अशोक पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक स्थापन करण्यात आले असून, या पथकामध्ये डॉ. योगिता शहा, डॉ. इला ओतारी, डॉ. दीपाली इंगवले, सूरज कवारे यांचा समावेश आहे.हे पथक सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिल्हा रुग्णालय आणि आवारात फिरत असते. रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक तंबाखू खाताना आढळल्यास त्यांचे सुरुवातीला समुपदेशन केले जात आहे. त्यानंतर दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली असून, यापैकी दंड आकारला जात आहे. संबंधिताला रितसर पावतीही दिली जात असून, तंबाखू खाण्यापासून होणारे दुष्परिणाम संबंधित रुग्ण व अथवा त्यांच्या नातेवाइकांना समजावून सांगितले जात आहेत. काही दिवसांपासून हे पथक सिव्हिलमध्ये कार्यरत झाले आहे. आत्तापर्यंत या पथकाने ४० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यांना या पथकाबद्दल माहिती आहे, अशा लोकांनी या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे. दिवसाप्रमाणेच रात्रीही कारवाई करण्याची मागणी होत आहे.$$्रिॅगुड न्यूज