शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पेरू आणायला गेलेल्या मुलाचा शॉक लागून मृत्यू

By admin | Updated: July 4, 2016 00:11 IST

वडगाव हवेलीतील घटना : उसात पडलेल्या तारेत अडकला पाय

वडगाव हवेली : पेरू आणण्यासाठी मित्रासोबत शिवारामध्ये गेलेल्या मुलाचा शेतात पडलेल्या वीज तारेत अडकून शॉक लागल्याने मृत्यू झाला. वडगाव हवेली येथील चव्हाण मळा रस्त्यावर ‘देशपांडके’ नावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय सुरेश मुळीक (वय १५, कार्वे-मुळीकमळा, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली येथे चव्हाण मळा रस्त्यावर देशपांडके नावाचे शिवार आहे. या शिवारातून वीजवाहक तारा गेल्या आहेत. संबंधित तारेमधील वीजपुरवठा अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे हे खांब हटवून तारा काढाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी वीजवितरण कंपनीकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वीज प्रवास सुरू नसल्याने त्या तारांकडे कोणीही लक्ष देत नव्हते. अशातच गत काही महिन्यांपासून या तारा लोंबकळत होत्या. काही ठिकाणी तारांचा पिकालाही स्पर्श होत होता. मात्र, प्रवाह नसल्याने शेतकरीही निर्धास्त होते. रविवारी कार्वे-मुळीकमळा येथील अक्षय मुळीक हा मुलगा त्याच्या एका मित्रासमवेत देशपांडके शिवारात पेरू आणण्यासाठी गेला होता. पेरूचे झाड उसाच्या बांधावर असल्याने दोघे मित्र उसातून वाट काढीत बांधाकडे निघाले होते. त्याचवेळी उसात तुटून पडलेली वीज तार अक्षयच्या पायाखाली आली. त्यामुळे त्याला जोराचा धक्का बसून तो तेथेच कोसळला. या घटनेमुळे घाबरलेला मित्र तेथून पळाला. त्याने आपल्या घरी जाऊन या घटनेची माहिती दिली. गावातून ग्रामस्थ त्याठिकाणी येईपर्यंत शेतात काम करणाऱ्या काही ग्रामस्थांनी अक्षयला उसात निपचित पडल्याचे पाहिले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अक्षयचा जागीच मृत्यू झाला होता. संबंधित तारेतून वीजप्रवाह सुरू नसला तरी पावसामुळे प्रवाह उलटा वाहत असावा व त्यामुळेच अक्षयचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वीजकंपनीच्या कारभारामुळे मुलाचा नाहक बळी गेल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर) दूरक्षेत्र असूनही पोलिस गायब... वडगाव हवेली येथे पोलिस दूरक्षेत्र आहे. मात्र, तेथे अपवाद वगळता कधीही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकत नाहीत. रविवारी घटनेनंतर काही ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मात्र, उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी आले नव्हते. वाटेत आहे, पावसात अडकलोय, अशी उत्तरे त्यांच्याकडून दिली जात होती. त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.