शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे कौतुक; भाजपच्या मंत्र्यांवर टीका

By admin | Updated: April 11, 2016 00:38 IST

शशिकांत शिंदे : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फटकेबाजी

कोरेगाव : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून सरकारची कोंडी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांवर एकाबाजूला जोरदार टीका केली तर शिवसेनेच्या मंत्र्यांचे कौतुक केले. विविध मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी सरकारचे वाभाडेच काढले. भाजपने हाती घेतलेल्या ‘मेक इन इंडिया’चा अत्यंत खरपूस भाषेत समाचार घेत शिवसेनेकडे उद्योग खाते असताना आणि ज्येष्ठ सदस्य सुभाष देसाई त्या खात्याचे मंत्री असताना त्यांना या कार्यक्रमापासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याची टीका आ. शिंदे यांनी केली. नेमके शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलावले जाते आणि व्यासपीठाला आग कशी लागते, यावर आ. शिंदे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. आज पुणे-मुंबई-ठाणे येथील औद्योगिक वसाहती ओव्हर फ्लो झाल्या आहेत, मुख्यमंत्र्यांसह भाजपला उद्योग विदर्भात न्यायचे आहेत, त्यासाठी सेव्हन स्टार औद्योगिक वसाहती उभारल्या जात आहेत; मात्र उद्योजकांना विदर्भात जायचे नाही, अशी परिस्थिती असताना राज्य अग्रेसर कसे होईल, असा सवालही त्यांनी केला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पुसेगाव येथे तीर्थक्षेत्र असून, सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. येथे ‘कार्गो हब’ होऊ शकतो, पाण्यासह सर्व व्यवस्था असल्याने ‘कार्गो हब’साठी तब्बल तीनवेळा बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. ‘मेक इन इंडिया’ जरूर करा; मात्र त्यातील योजना फसवी ठरू नये,’ असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)केवळ स्वार्थ साधू नये...मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना केवळ करू.. केवळ करू.. च्या घोषणा सरकार करत आहे, प्रत्यक्षात मात्र काहीच होताना दिसत नाही, असा आरोप केला. दीड वर्षापासून राज्यात युती सरकार आहे; मात्र दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. श्रेयवाद घेण्यासाठी दोन्ही पक्षांची स्पर्धा आहे, स्पर्धा जरूर असावी; मात्र ती जनतेसाठी असावी. त्यातून केवळ स्वार्थ साधला जाऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी नोंदविले