‘शिवसमर्थ’च्या सवादे शाखेत आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसमर्थ समूहाचे प्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, देवबा वायचळ, विठ्ठलराव पाचुपते, पी. आर. सावंत, नानासाहेब सावंत, लक्ष्मण माने, माधुरी माने, डॉ. प्रशांत कांबळे, लक्ष्मी सुतार, दिनकर कांबळे, रघुनाथ पाटील, मानसिंग जाधव-पाटील, जगन्नाथ थोरात, पुजाराणी थोरात, वसंत थोरात, राजाराम थोरात उपस्थित होते.
‘अविरत कार्यरत असलेल्या शिवसमर्थ संस्थेने आपल्या कार्यविस्ताराने जनमानसावर आपली प्रतिमा तयार केली आहे. एनईएफटी, आरटीजीएस अशा सुविधा देत संस्थेने काळानुरूप आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेल्या संस्था आपली नेत्रदीपक वाटचाल करीत आहे. आर्थिक सेवा देत असताना सामान्य माणसाला बचतीची सवय लागावी, त्या बचतीतून त्यांची छोटी-मोठी कामे व्हावीत’, असा मानस असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. जनार्दन बोत्रे यांनी यावेळी सांगितले.
इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, विजय सवादकर, विजय मोहिते, दादासाहेब नायकवडी, अभिजित गायकवाड, महादेव शेवाळे, शिवराज पाटील, शिवानी म्हारुगडे, रवींद्र चोरगे, धनाजी पाटील, सागर जाधव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. (वा. प्र.)
फोटो : ०१केआरडी०१
कॅप्शन : शिवसमर्थ संस्थेच्या सवादे (ता. कऱ्हाड) येथील शाखेत कार्यक्रमाचे उद्घाटन बाबा महाराज मठाचे मठाधिपती बाबासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले.