शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवेंद्रसिंहराजेंचीे उच्च न्यायालयात धाव-- सुरुचि हल्ला प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:31 IST

सातारा : सुरुचिवरील धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांनी आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्याने दाखल केलेले दोन्ही गुन्हे खोटे असून, ते रद्द करण्यात यावेत,

ठळक मुद्देपोलिसांनी आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचे अर्जात नमूद आमदारांच्या चार कार्यकर्त्यांना कोठडीन्यायालयाला दिवाळीची सुटी लागणार असल्यामुळे आता यावर सुनावणी दिवाळीनंतर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सुरुचिवरील धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांनी आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्याने दाखल केलेले दोन्ही गुन्हे खोटे असून, ते रद्द करण्यात यावेत, अशी याचिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते अजिंक्य मोहिते यानेही शिवेंद्रसिंहराजेंवर गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांच्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अ‍ॅड. धीरज घाडगे यांच्या वतीने शिवेंद्रसिंहराजेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यामध्ये पोलिस अधिकाºयांनी अपूर्ण माहितीच्या आधारे फिर्याद नोंद केली आहे. ती खोटी असून रद्द करण्यात यावी, असे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने शाहूपुरी पोलिसांना यावर आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलिसांनी अद्यापही यावर म्हणणे सादर केले नसल्याचे अ‍ॅड. धीरज घाडगे यांनी सांगितले.

सध्या न्यायालयाला दिवाळीची सुटी लागणार असल्यामुळे आता यावर सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे.दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरुचिवर झालेल्या धुमश्चक्रीनंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांवर हक्कभंग आणि न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सुतोवाच केले होते. आमच्याच घरावर हल्ला झाला असताना पोलिसांनी आमच्यावरच गुन्हा कसा दाखल केला? असाही प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी त्यावेळी उपस्थित केला होता.आमदारांच्या चार कार्यकर्त्यांना कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सुरुचिवरील धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी दुसºया गुन्ह्यात अटक केली. यामध्ये चारीही कार्यकर्त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटकेत असलेल्या सात कार्यकर्त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सुरुचिवर दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्यानंतर पोलिसांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यामध्ये हर्षल चिकणे, नितीन सोडमिसे, चेतन सोळंखी, प्रतीक शिंदे यांचा समावेश होता. या चौघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी दुसºया गुन्ह्यात त्यांना शुक्रवारी अटक केली.