शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बोंडारवाडीसाठी शिवेंद्रराजे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:28 IST

सातारा : ‘जावळी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला तत्काळ मंजुरी देऊन धरणाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, या ...

सातारा : ‘जावळी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला तत्काळ मंजुरी देऊन धरणाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, या प्रमुख मागणीसह सातारा तालुक्यातील लावंघर उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावा आणि उरमोडी धरण प्रकल्पाच्या सातारा तालुक्यातील कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करा, या मागण्यांसाठी सातारा-जावळी मतदारसंघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला.या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लक्षवेधी वेशभूषा करून विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अनोखे आंदोलन केले. दरम्यान, सरकारने मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणातील पाणी खाली जाऊ देणार नाही, असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.डोंगराळ आणि टंचाईग्रस्त जावळी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. तसेच लावंघर व परळी भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लावंघर उपसा सिंचन योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेचे काम सुरू करण्यासाठी आणि उरमोडी धरणातून सातारा तालुक्यात सिंचनासाठी सुरू असलेली कालव्यांची कामे पूर्ण व्हावीत, यासाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र राज्य सरकार आणि शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनोखे आंदोलन केले.अनोखा पोषाख अन् डोक्यावर गांधी टोपीमुंबईत अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसºया दिवशी (मंगळवारी) आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मागण्यांचा उल्लेख असलेला पोषाख परिधान करून आणि गांधी टोपी डोक्यावर घालून केलेल्या आंदोलनामुळे दिवसभर या आंदोलनाचीच चर्चा रंगली.