शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाहूनगरीसह जिल्हा झाला शिवमय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:45 IST

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ...

सातारा : स्वराज्याची राजधानी असणाºया सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात सोमवारी शिवजयंती साजरी होत असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साताºयात नगरपरिषदेतर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भगवे झेंडे, पताका, बॅनर आणि रविवारी सकाळपासून निघालेल्या दुचाकी रॅली व ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदींच्या जयघोषामुळे सर्वत्र शिवमय वातावरण आहे.साताºयाबरोबरच जिल्ह्यात सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. साताºयात दि. १९ रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषद कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याच ठिकाणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य शाही मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. तसेच सातारा शहरातील विविध तरुण मित्र मंडळांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सातारा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले. तर मुख्य चौक आणि बाजारपेठेत भगव्या पताका लावण्यात आल्या. अनेक मंडळांनी रस्त्यावरून दुचाकी रॅली काढली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि कोरेगाव रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती. तसेच बाजारपेठेत पंचधातूचे कडे व राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेले टीशर्ट खरेदी करण्यासाठीही गर्दी झाली होती.सायंकाळी अजिंक्यतारा किल्ल्यावरून मशाली पेटवून नेण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या तरुणांनी गर्दी केली होती. तसेच शहरातील मंडळे इतर जिल्ह्यांतील किल्ल्यांवरून ज्योत आणण्यासाठी रवाना झाली आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले आहे.