शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

शिवसेनेच्या दोन गटात जोरदार हाणामारी

By admin | Updated: May 28, 2015 01:00 IST

विठुरायाचीवाडी येथे तोडफोड : परस्परविरोधी फिर्यादी; घर, गाडीवर दगडफेक

कवठेमहांकाळ : शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील आणि वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे समर्थकांत मंगळवारी जोरदार हाणामारी झाली. पाटील समर्थकांनी देशिंगच्या वैभव कुमार जाधव याला दमदाटी केली, तर शिंत्रे समर्थकांनी मंगळवारी मध्यरात्री विठुरायाचीवाडी येथे मल्हारी गेंड या पाटील समर्थकाची गाडी, बंगला आणि सामाजिक सभागृहावर दगडफेक केली. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.मंगळवारी दुपारी देशिंगच्या वैभव जाधव याने तालुकाप्रमुख दिनकर पाटील, अर्जुन मल्हारी गेंड आणि अमोल जाधव यांच्यासह दहा ते बारा जणांविरोधात फिर्याद दिली आहे. संदीप शिंत्रे कुठे आहे? अशी विचारणा करीत शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, तर याचा राग मनात धरून शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे याचा चुलत भाऊ अमित शिंत्रे, सागर जाधव यांच्यासह तीस ते चाळीस समर्थकांनी मंगळवारी मध्यरात्री विठुरायाचीवाडी येथे धिंगाणा घातला.चारचाकी वाहनांतून आणि पंधरा ते वीस दुचाकीवरून आलेल्या या जमावाने, तू दिनकर पाटील यांचे काम का करतोस, असा जाब विचारत शाखाप्रमुख मल्हारी गेंड यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. चारचाकीवर दगडफेक करून सुमारे दोन लाखांचे नुकसान केले आहे. यावेळी शिंत्रे समर्थकांनी बांधलेल्या सामाजिक सभागृहावरही दगडफेक केली. सभागृहाच्या काचा फोडल्या. आसपासच्या घरावरही दगडफेक केली. हा धिंगाणा मध्यरात्री उशिरापर्यंत चालूच होता.याबाबत मल्हारी विठ्ठल गेंड यांनी पोलीस ठाण्यात वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंत्रे याचा चुलत भाऊ अमित शिंत्रे, सागर जाधव यांच्यासह समर्थकांविरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान, तालुकाप्रमुख दिनकर पाटील व संदीप शिंत्रे समर्थकांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (वार्ताहर)