शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या वाढदिनी शिवसेनेचे उपोषण

By admin | Updated: December 10, 2015 01:02 IST

वासुदेव माने : रहिमतपूर पालिकेच्या भ्रष्टाचारप्रकरणी सुनील माने यांच्यावर हल्लाबोल

रहिमतपूर : ‘पाणी मीटर मधील भ्रष्टाचार लपविणेसाठी सभांमधून कोणाच्याही वैयक्तिक कुटुंबाची वाभाडे काढणार असाल तर मला खालच्या पायरीवर उतरायला लावू नका,’ असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख वासुदेव माने यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला. तसेच भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवारीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसापासून उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रहिमतपूर येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तानाजी शेडगे, अ‍ॅड. अमर माने, अ‍ॅड. वैभव माने, किरण भोसले, अमर मदने, बाळासाहेब बर्गे, शंकर माने, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.माने म्हणाले, ‘पाणी मीटरमधील भ्रष्टाचार जोपर्यंत उघडं होत नाही. तोपर्यंत शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेनेने उचलेले प्रत्येक पाऊल बहुजन हिताय व बहुजन सुखाय या न्यायाने करणार आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक आहोत मालक नाही हे लक्षात घेऊन वागावे. शहरातील सर्व कामे सुयोग्य स्थितीत करावीत. नेहमी जवळच्या ठेकेदाराला टेंडर देऊ नये. अन्यथा त्याला जशास तसे उत्तर आगामी काळात दिले जाईल.’अ‍ॅड. अमर माने म्हणाले की, ‘शहरामध्ये भ्रष्टाचारी पाणी मीटर पद्धती घालवायची असेल तर लोकांनी घरपट्टी व पाणी पट्टी भरू नये. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा नागरिकांचे आर्थिक शोषण जे चालू आहे ते थांबवावे. भ्रष्टाचाराला सुद्धा काही मर्यादा असतात. त्या ओलांडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.सतीश आडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजित भोसले यांनी आभार मानले. यावेळी ा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (वार्ताहर)मी शहराच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करत असून पाणी मीटर भ्रष्टाचारासंबंधी वासुदेव माने यांनी आरोप व उपोषण करण्यापेक्षा त्यांचे सरकार व पालकमंत्री असल्याने चौकशी लावावी. तसेच मीटर काढण्याची आॅर्डर त्यांच्या सरकारकडून त्यांनी घ्यावी. कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही.-सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उच्च न्यायालयात दावा दाखल करणारशहराचा दुसरा प्रारुप विकास आराखडा सर्व समाज घटकांना घेवून करणे गरजेचे होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हुकुमशाही राबवुन हा आराखडा केला आहे. त्यामुळे रहिमतपूरकरांचे स्वास्थ बिघडले असून त्या धक्याने एकाचा बळी सुद्धा गेला आहे. रहिमतपूरमध्ये जी काही नियमबाह्य व विकास आराखड्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. वैभव माने यांनी सभेत सांगितले.