लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेने ओमिनी गाडी ढकलस्टार्ट करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. कोरोनाकाळात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोना महामारीमुळे असंख्य लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली, असे असताना केंद्र सरकारकडून तब्बल २० हून अधिकवेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत चालले असून शुक्रवारी २५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. त्यावर शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चारचाकी ओमिनी गाडी ढकलत केंद्र सरकारचा निषेध केला.
शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनास जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, रणजित भोसले, शंकर सकपाळ, दत्तात्रय नलावडे, आशिष ननावरे, अनिल गुजर, नीलेश मोरे, बाळासाहेब शिंदे, सचिन जगताप, प्रशांत नलावडे, सागर रायते, अजय सावंत आदी उपस्थित होते.