शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रतिष्ठानचा कऱ्हाडात निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST

कऱ्हाड : हिंदू धर्मातील परंपरा व संस्कृती असलेली वारी खंडित केल्याबद्दल तसेच हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने सोमवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे ...

कऱ्हाड : हिंदू धर्मातील परंपरा व संस्कृती असलेली वारी खंडित केल्याबद्दल तसेच हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने सोमवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शासनाचा जाहीर निषेध करत शहरात मोर्चा काढण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.

या निवदेनात म्हटले आहे की, गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे होरपळून गेलेल्या राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी, कोरोना कमी होण्यासाठी सर्व जनता प्रशासनाला सहकार्य करत आहे. प्रशासनाचे सर्व निर्बंध सचोटीने पाळत आहे. गतवर्षी आषाढी कार्तिकीच्या पायी दिंडी सोहळ्याला शासनाने बंधने घातली आणि दिंडी सोहळा रद्द केला. एकूण परिस्थिती पाहता हिंदू बांधवांनी तो निर्णय मान्य केला. मात्र, यंदा लसीकरण हा पर्याय उपलब्ध असताना व प्रशासनाचे सर्व नियम, अटी, शर्ती पाळून काही निवडक वारकऱ्यांसह बंडातात्या कऱ्हाडकर यांनी वारीला जाण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना प्रशासनाने स्थानबद्ध केले आहे.

पंढरपूर निवडणुकीत प्रचंड संख्येने प्रचार सभा झाल्या. पुण्यामध्ये एका राजकीय कार्यालयाचे प्रचंड संख्येत उद्घाटन झाले. मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेचे प्रचंड संख्येत उद्घाटन झाले. अनेक साखर कारखान्यांच्या निवडणुका व प्रचार सभा पार पडल्या. राजकीय लोकांच्या वाढदिवसाला गर्दी होत आहे. हे सर्व व प्रशासनाला चालते. मात्र, हिंदू धर्मातील परंपरा पाळल्यास कोरोना होतो, हे शहाणपण प्रशासनाला कसे सुचते. हिंदू धर्मातील परंपरा खंडित करण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही. शासनाची प्रजेसाठी जी कामे आहेत ती शासन करतच नाही. मात्र, हिंदू धर्मातील प्रथा, परंपरांना अटकाव, निर्बंध घालणे हेच शासनाचे काम झाले आहे. त्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करत असल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी झाले होते.

फोटो : ०५ केआरडी ०६

कॅप्शन : कऱ्हाडात सोमवारी सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने शासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढला.