शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडीच्या युवकाला दुहेरी जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झोपलेल्या अवस्थेत असताना खिशातून पैसे काढल्याच्या रागातून अनुराग सचिन अहिवळे (वय १४, रा. शिंदेवाडी, ता.फलटण) या अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी त्याच गावातील पांडुरंग राजेंद्र पवार (वय २२) याला चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दुहेरी जन्मठेप आणि सव्वा लाखाचा दंड ठोठावला.या खटल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झोपलेल्या अवस्थेत असताना खिशातून पैसे काढल्याच्या रागातून अनुराग सचिन अहिवळे (वय १४, रा. शिंदेवाडी, ता.फलटण) या अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी त्याच गावातील पांडुरंग राजेंद्र पवार (वय २२) याला चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दुहेरी जन्मठेप आणि सव्वा लाखाचा दंड ठोठावला.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, १० नोव्हेंबर २०१५ रोजी सांयकाळी पाच वाजता शिंदेवाडीपासून काही अंतरावर अनुराग अहिवळे याचा अज्ञाताने डोक्यात वार करून खून केला होता. या घटनेच्या काही दिवस अगोदर पांडूरंग आणि अनुरागला एका व्यक्तीने फलटण बसस्थानकात पाहिले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी पांडुरंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. फलटण बसस्थानकात पांडूरंग हा झोपला होता. त्यावेळी अनुरागने त्याच्या खिशातून काही पैसे काढले. हा प्रकार पांडुरंगला समजल्यानंतर त्याने पैसे परत मिळविण्यासाठी अनुरागकडे तगादा लावला. मात्र, अनुरागकडून त्याला पैसे परत मिळत नसल्याने त्याने त्याच्या खुनाचा कट रचला. अनुरागला त्याने फलटण बसस्थानकातून एसटीने काही अंतरावर नेले. निर्जन ठिकाणी अनुरागला नेऊन त्याच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला. असे तपासात निष्पन्न झाले.सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील उर्मिला फडतरे आणि अजित कदम यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.