सायगाव : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावळीच्या मैदानात उतरणार आहेत. निमित्त हे राजकीय नसून कुडाळमध्ये आयोजित क्रिकेट सामन्याचे आहे. या सामन्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा टायगर्स विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ११११ संघ यांच्यात हा सामना रंगणार आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात कोण जिंकणार? याचीच उत्सुकता जिल्ह्यातील राजकीय मंडळी, क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.आमदार शिंदे यांनी यांनी १९९९ मध्ये जावळीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत जावळी तालुका सातारा विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आल्यामुळे तालुक्याची धुरा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हातात आली. तर आमदार शिंदे यांच्याकडे कोरेगावची जबाबदारी आली. आजही आमदार शिंदेंची निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी जावळीत कार्यरत आहे. शिंदेंच्या कोरेगाव मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे. सभापती अरुणा शिर्के, पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे यांच्यासह नटराज फेस्टिव्हल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामना होत आहे.शिवेंद्रसिंहराजे उत्कृष्ट बॅटसमन तर शिंदे आॅल राउंडर...दोन्ही आमदार हे जिल्ह्याच्या राजकारणात उत्कृष्ट राजकीय खेळाडू म्हणून ओळखले जातात. तर दोन्ही आमदार हे उत्कृष्ट क्रिकेटपटूदेखील आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उत्कृष्ट बॅटसमन आहेत. त्यांची जावळीच्या या मैदानावर बॅटिंग कशी राहते, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. तर आमदार शिंदे हे उत्कृष्ट बॅटसमन व बॉलरदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या बॉलिंगवर आमदार शिवेंद्रसिंहराजे हे षटकार लावतात की शिंदे त्यांना क्लिनबोल्ड करतात, याचीदेखील उत्सुकता लागून राहिली आहे.मानकुमरे सामन्याचे पंच...दोन्ही आमदारांना साथ असणाºया जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरेंची तालुक्याच्या राजकारणात नेहमी निर्णायक भूमिका राहिली आहे. आमदारकीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंना तर जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शिंदे यांना नेहमीच त्यांचे आत्तापर्यंत सहकार्य राहिले आहे. तर मानकुमरे यांनीही दोन्ही आमदारांशी आपला सुसंवाद ठेवून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नाही; पण उपाध्यक्षपद मिळवले. आता त्यांच्यावर या सामन्याचे पंच म्हणून मोठी जबाबदारी राहणार आहे.
शिंदेंची गुगली; बाबांचा षटकार.. पण विकेट कोणाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:35 IST
सायगाव : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावळीच्या मैदानात उतरणार आहेत. निमित्त हे राजकीय नसून कुडाळमध्ये आयोजित क्रिकेट सामन्याचे आहे. या सामन्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा टायगर्स विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ११११ संघ यांच्यात हा सामना रंगणार आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात कोण जिंकणार? याचीच उत्सुकता जिल्ह्यातील ...
शिंदेंची गुगली; बाबांचा षटकार.. पण विकेट कोणाची?
ठळक मुद्देकार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता : शशिकांत शिंदेंचा टायगर्स का शिवेंद्र्रसिंहराजेंचा ११११ संघ जिंकणार? याकडे लक्ष