सातारा : जिल्हा परिषदेच्या राजकारणातील ‘ना’राजीनामा नाट्य अजूनही सुरूच आहे. मागील सभेसाठी तयार केलेला अर्थसंकल्प अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सभागृहापुढे सादर केला. या सभेला माजी अर्थ समितीचे सभापती अमित कदम यांनी रजा टाकली. तर पक्षाच्या धोरणाविरोधात शड्डू ठोकून कोर्टात गेलेले कृषी समिती सभापती शिवाजीराव शिंदे गैरहजर राहिले होते. स्वकीयांची ‘नाराजी’ अन् विरोधकांचा ‘कलकलाट’ या दोन्ही बाजू सावरत अध्यक्ष माणिकराव सोनवलकर व उपाध्यक्ष रवी साळुंखे या जोडीने एकत्रितपणे सभेचे कामकाज हाताळले. राष्ट्रवादीतीलच एका गटाने मागील अर्थसंकल्पीय सभा तहकूब करण्यास भाग पाडले होते, तोच अध्याय गिरविण्याचा प्रयत्न सोमवारी विरोधक काँगे्रस व भाजपच्या सदस्यांनी केला; पण उधळला गेला. काही काळ गोंधळ झाल्यानंतर ‘त्यावेळचे निर्णय त्यावेळी’ अशी राजकीय शिकवण अध्यक्षांनी विरोधकांना शिकविली. मंजूर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये २५.६८ कोटी इतके महसुली उत्पन्न गृहित धरण्यात आले असून, त्यापैकी २५.४८ कोटी महसुली खर्चाचे अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले होते. २० लाख रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. १३ विभागांना आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)कृषी समितीवर भरगुडे, गावडेकृषी समितीच्या रिक्त पदांवर खंडाळ्याचे सभापती नितीन भरगुडे-पाटील व वैशाली गावडे यांची कृषी समितीवर निवड करण्यात आली आहे. आज सुनावणी; दि. २२ रोजी निवडी!नियमबाह्य राजीनामा घेतल्याचा आरोप करत कृषी सभापती शिवाजीराव शिंदे न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर मंगळवारी (दि. १५) जिल्हा परिषदेतर्फे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील व सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास हे न्यायालयात म्हणणे मांडणार आहेत. दरम्यान, दि. २२ मार्च रोजी कृषी समिती वगळता इतर सभापतींच्या निवडी जिल्हा परिषदमध्ये होणार आहेत. ...अशा आहेत तरतुदीसामान्य प्रशासनाला२३१.८२ लाखशिक्षण विभागाला२ कोटीबांधकाम विभागाला४ कोटीलघुपाटबंधारे विभागाला८० लाखआरोग्य विभागाला८० लाखकृषी विभागाला१ कोटीपशुसंवर्धन४० लाखसमाजकल्याण२८५.९१ लाखमहिला व बालकल्याण१०४.४२ लाखएकात्मिक बाल ५ लाखविकास प्रकल्पग्रामीण पाणीपुरवठा५४९.६९जिल्हा परिषद मुद्रणालय२२९.७८ लाख
कदम रजेवर तर शिंदेंची गैरहजेरी!
By admin | Updated: March 15, 2016 00:36 IST