हल्ली गल्लोगल्ली एकतरी ‘गल्ली दादा’ आपल्याला पहायला मिळतो. साताऱ्यातील एका चौकात अशाच एका दादा व त्याच्या समर्थकांची गप्पांची मैफल रंगली होती. ‘दादा’ आपल्या घराजवळील गटाराच्या प्रश्नावरून अधिकाऱ्याला कसे खडे बोल सुनावले हे समर्थकांना उत्साहाने सांगत होता. समर्थकदेखील त्याच्या प्रत्येक वाक्याला भरभरून दाद देत होते. मी असं केलं, मी तसं केलं, त्याला चांगला वठणीवर आणला, आता काम झालं बघा, असं बरच काही तो बोलून गेला. हे ऐकून आपल्या दादाने काहीतरी मोठं काम केलं असावं असे हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आले. गप्पांची मैफल शेवटच्या टप्प्यावर आली असतानाच त्यातील एक जण म्हणाला ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट, चला त्याला आता चहा पाजा’. एवढंच ना, चला जाऊ असं म्हणत तो दादा आपल्या समर्थकांना घेऊन चहाच्या टपरीकडे निघून गेला.
शेठ.. तुम्ही नादच केला थेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST