शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दैवतांच्या मंदिराला मेंढ्यांची फेरी

By admin | Updated: October 25, 2014 23:50 IST

वरकुटे-मलवडी : शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील मेंढपाळांनी गावातील दैवतांच्या मंदिराला मेंढरांची फेरी काढून जाण्याची परंपरा शेकडो वर्षांनंतरही कायम आहे. येथील दिवाळीचे हे एक मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.सुमारे शंभर वर्षांपूर्वी गावकुसातील मेंढपाळांनी ही परंपरा सुरू केली आहे. जवळपास शंभर ते दोनशे मेंढरांचे कळप असणारे अनेक मेंढपाळ वरकुटे-मलवडीच्या पंचक्रोशीत आहेत. दिवाळीच्या पाडव्यादिवशी आपल्या मेंढरांचा कळप घेऊन गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी घालण्याची प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे.नामदेव मिसाळ बासरीच्या सुरावर मेंढरांचे खेळ करून दाखवित असत. यामध्ये बासरीच्या सुरावर मेंढीला बोलावून घेणे, मेंढीला खाली बसवून रांगायला लावणे, मेंढीचे डोळे बांधून रांगायला लावणे असे खेळ करीत तसेच बकऱ्याच्या टकरा खेळावयास लावणे, अशा विविध खेळ गावात हे मेंढपाळ मोठ्या हौशेने दाखवितात.दिवाळी दिवशी मेंढ्यांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवून त्या गावात आणली जातात, गावच्या मध्यभागी ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर हा मेंढरांचा खेळ सकाळी ७.३० वा. पासून दुपारी १२ वाजेपर्यंत चालतो. ग्रामस्थ गावच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामपंचायत चौकात फटाके वाजवून दिवाळीचे स्वागत व मेंढरांना घाबरवत असतात.पूर्वी गावाच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीवर उभे राहून मेंढपाळ बासरी वाजवून मेंढ्याच्या कलागुण उपस्थित ग्रामस्थांस दाखवत. अनेकवेळा इमारतीस मेंढ्यांचा वेडा पूर्ण झाला तरीही अधिककाळ हा मेंढ्यांचा कळप भोवताली किती तरी वेळ फेऱ्या मारत असत, असे चित्र असायचे. गावचे ग्रामदैवत नाथ-लक्ष्मीमाता मंदिर आदी मंदिराभोवताली मेंढ्यांची प्रदक्षिणा घालून दिवाळी साजरी करण्याची प्रथा याहीवर्षी मेंढपाळांनी कायम ठेवली. यावेळी वरकुटे -मलवडी परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)