शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या डॉक्टरकीसाठी मेंढपाळानं विकला कळप!

By admin | Updated: June 19, 2016 00:51 IST

स्वीकारला रखवालदाराचा पेशा : दस्तुरीतील बाबूराव सूळ यांच्या त्यागाला सलाम

सूर्यकांत निंबाळकर, आदर्की स्वत:चे अवघे सातवीपर्यंत शिक्षण झालेले तर पत्नी अशिक्षित; पण त्यांच्याच पोटी जन्म घेतलेल्या सारिकाने मात्र दहावीत तब्बल नव्वद टक्के गुण मिळविले. डॉक्टर बनण्याचं तिनं स्वप्न पाहिलं, ते सत्यात उतरवण्यासाठी पैसा हवाच होता. पैशाचं संकट आलं तेव्हा या पित्याने चक्क मेंढरांचा कळपच विकला. प्रत्येकजण ऐपतीनुसार शिकवण्याचा प्रयत्नही करतो. दस्तुरी येथील जिद्दी बाबूराव उमाजी सूळ यांचा त्याग थक्क करणारा आहे. बाबूराव सूळ यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शिक्षण सोडून मेंढपाळ व्यवसाय करण्याचा निधार केला. पै-पै गोळा करून त्यांनी मेंढ्यांचा चांगला कळप उभारला. मेंढ्या घेऊन डोंगरांवर त्यांची भटकंती सुरू होती. दिवसभर भटकंती करायची अन् सायंकाळी शेतकऱ्यांच्या रानात मेंढ्यांसह मुक्काम करायचा, तेव्हा धान्य मिळायचं. हा दिनक्रम त्यांचा सुरू होता. त्यांच्या मुली सारिका व रेश्मा शाळा सुटल्यावर किंवा सुटीत मेंढरं हाकण्यासाठी मदत करत होते. सारिकाने आदर्की खुर्द माध्यमिक विद्यालयात नव्वद टक्के गुण मिळविले. तर गणितात दीडशे पैकी दीडशे गुण मिळविले. मुलीची प्रगती पाहून वडिलांनी सारिकाला बारावीसाठी साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तेथेही तिला ७५ टक्के गुण मिळाले. सारिकाला डॉक्टर व्हायचे होते; पण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार होता. पैशांअभावी शिक्षण राहू नये म्हणून या पित्याने चक्क जीवापाड जपलेली मेंढरं विकण्याचा निर्णय घेतला. बारा वर्षे हा व्यवसाय केलेल्या सूळ यांनी सारिकाच्या उच्च शिक्षणासाठी मेंढ्या विकून पुण्यातील धोंडू मामा मेडिकल कालेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी एका कंपनीत रखवालदाराची नोकरी स्वीकारली. सध्या ते आदर्की बुद्रुक येथील विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत रखवालदाराचे काम करत आहेत. वडिलांनी केलेल्या त्यागाची जाण ठेवून सारिका यांनी जिद्दीने होमिओपॅथीमध्ये पहिल्या क्रमांकाने ती डॉक्टर झाली.