शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेंद्रे झेडपी गटात जोरदार रस्सीखेच

By admin | Updated: October 15, 2016 23:44 IST

दोन गण आरक्षित : खासदार गटात होणार चुरस

सागर नावडकर ल्ल शेंद्रे जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणात सातारा तालुक्यातील शेंद्रे गट खुला झाल्याने आगामी निवडणुकीत मोठी चुरस होणार आहे. तसेच उमेदवारी मिळविण्यासाठीही मोठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. पंचायत समितीचे शेंद्रे व दरे खुर्द हे दोन्ही गण आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. शेंद्रे गटातील दोन्ही गण आरक्षित झाल्याने जिल्हा परिषदेसाठी काट्याची टक्कर तर पंचायत समितीसाठी उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव, असे चित्र पाहायला मिळणार आहे. गेली दोन पंचवार्षिक निवडणुकीत शेंद्रे गट व शेंद्रे गण हे खा. उदयनराजे भोसले यांच्या गटाकडे आहेत. तर पूर्वीचा जकातवाडी व सध्याचा दरे खुर्द गण आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाकडे आहेत. शेंद्रे गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव झाला आहे. तर दरे खुर्द हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष उमेदवारासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गणांत खासदार व आमदार यांच्याकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार निवडून येणार, हे निश्चितच आहे. तर याउलट जिल्हा परिषदेसाठी शेंद्रे गट खुला झाल्याने दोन पंचवार्षिकपासून प्रतीक्षेत असणारे अनेक मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. शेंद्रे गटात शेंद्रे, सोनगाव तर्फ बोरगाव, आसनगाव या गावांतील मतदार संख्या जास्त असल्याने या गटावर या गावांचा प्रभाव जास्त असतो. शेंद्रे गट हा गेली दोन निवडणुकीत खासदार गटाकडे असल्याने यावर्षीही तो खासदार गटाकडे राहण्याची दाट शक्यता आहे. शेंद्रे गटामध्ये अजिंक्यतारा साखर कारखाना व कारखान्याचे कार्यक्षेत्र असल्याने यावेळी आमदार गटाकडूनही या गटावर दावा केला जाऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गटासाठी खासदार गटात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होऊ शकते. खासदार गटाकडून जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील काटकर, माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ, अ‍ॅड. अंकुशराव जाधव, बजरंग कदम, संजय पोतेकर, संजय साळुंखे असे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. तर आमदार गटाकडून माजी उपसभापती अरविंद चव्हाण, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अजिंक्यतारा सूतगिरणीचे संचालक उत्तमराव नावडकर, सोनगावचे माजी सरपंच विश्वास नावडकर, संतोष कदम, अशोक मोरे यांचे नावे पुढे येत आहेत. तर भाजपकडून शहापूरचे सुभाष माने यांना संधी दिली जाऊ शकते. शेंद्र गटात भाजप व शिवसेनेचे अस्तित्व अत्यंत कमी असल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे; मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काटकर की पडवळ याचीच उत्सुकता जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गटात उमेदवारीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनील काटकर व पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ यांच्यात कोणाला संधी मिळणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांच्या नावाची शेंद्रे गटात जोरदार चर्चा आहे.