शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेखरभाऊंनी काढला वचपा..

By admin | Updated: February 23, 2017 23:12 IST

माण पंचायत समिती राष्ट्रवादीकडे : कुकुडवाडमध्ये भाजप तर काँग्रेसला गटाची एक गणाच्या तीन जागा

नवनाथ जगदाळे ---दहिवडी -माण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत ५ पैकी ३ जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसला आणि भाजपला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. पंचायत समितीच्या १० जागांपैकी सभापती आरक्षित जागेसह राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली असून, ५ जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी युतीतील ‘रासप’ला १ जागा मिळाली आहे. काँग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाली आहे.माण तालुक्यात माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना राष्ट्रवादी पक्षातून विजयी झाल्या आहेत. मार्डी गटातून सोनाली मनोज पोळ व गोंदवलेमधून डॉ. भारती संदीप पोळ या निवडून आल्या आहेत. महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आंधाळी गटात शेखर गोरे यांनी आमदार जयकुमार गोरे यांना धक्का दिला असून, राष्ट्रवादीचे बाबा पवार विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी दुर्योधन सस्ते यांचा पराभव केला आहे. याठिकाणी सत्तांतर झाले आहे. बिदाल गट पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे यांचा पराभव केला. तर कुकुडवाड गटात माय-लेकीच्या लढतीत लेकीने बाजी मारली आहे. तेथे प्रथमच कमळ फुलले असून, सुवर्णा अरुण देसाई यांनी कांचनमाला जगताप यांचा पराभव केला आहे. पंचायत समितीमध्ये आंधळी गटातील आंधळी गणात व मलवडी गणात राष्ट्रवादीने बाजी मारली. आंधळीत कविता विवेकानंद जगदाळे तर मलवडीत विजयकुमार निवृत्ती मगर निवडून आले आहेत. बिदाल गटाच्या दोन्ही गणांत काँग्रेसने पुन्हा वर्चस्व राखले असून, बिदाल गणात अपर्णा भोसले तर वावरहिरे गणात रंजना जगदाळे विजयी झाल्या आहेत. गोंदवले गट पुन्हा राष्ट्रवादीने राखला असून, गोंदवले गणातून तानाजी कट्टे, पळशी गणातून नितीन राजगे हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. मार्डी गटातील मार्डी गणात सभापतीचे आरक्षण होते. तेथे राष्ट्रवादीचे रमेश पाटोळे हे सभापतिपदाचे उमेदवार निवडून आले आहे.राष्ट्रवादी व ‘रासप’च्या युतीचा फायदा झाला आहे.