शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पसरणी घाटात होतेय राजरोसपणे वृक्षांची कत्तल

By admin | Updated: June 24, 2017 15:23 IST

संबंधित विभागाने दखल न घेतल्यास अनेक वृक्षांची होणार बिमोड

आॅनलाईन लोकमतवाई , दि. २४ : वाईच्या पश्चिम भागासह परिसरातील डोंगरावरील झाडे व जंगले ही संरक्षित आहेत़ यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचा व पक्ष्यांचा अधिवास आहे़ अशा ठिकाणची वृक्षतोड झाल्यास या प्राणी व पक्ष्यांचा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो़ वाई शहरापासून जवळ असलेल्या पसरणी घाटात मुख्य रस्त्याच्या बाजूला अनेक झाडांची कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ या घटनेची संबंधित विभाग हा नेहमीच डोळेझाक करत असल्याने वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे़ वाई-पाचगणी रोडवरील पसरणी घाटात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे़ ही झाडांची हिरवाई पर्यटकांसह स्थनिकांना भुरळ पाडत असते़ या परिसरात अनेक प्राणी यामध्ये काळवीट, ससे, कोल्हे, रानडुकरे, मुंगस, सायळ, पक्ष्यांमध्ये मोर, गरुड, घार, कोकीळ विविध प्रकारचे पक्षी तसेच अनेक सरपटणारे जीव वास्तव्यास आहेत़ अशा प्रकारचे राजरोसपणे झांडाची कत्तल होत राहिल्यास जंगली जिवांचा अधिवास धोक्यात येत आहे़ झाडांची कत्तल करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांनी झाडे ही अध्यार्तून तोडून नेली आहेत़ तरी संबंधित विभागाने पाहणी करून दोषींना कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेंमीमधून जोर धरू लागली आहे़

वृक्षतोड रोखण्यास वनविभाग अपयशी...

या परिसरात असे वृक्षतोडीचे प्रकार वारंवार घडत आहेत़ पसरणी घाटात सामाजिक संस्था पर्यावरणपे्रमींकडून वृक्षारोपण करून वर्षभर संवर्धन करण्याचे काम करत आहेत़ परंतु संबंधित वनविभागाला पसरणी घाटातील वारंवार घडणारे वृक्षतोडीचे प्रकार रोखण्यात अपयश आले आहे़ ही दुदैर्वी बाब असून, असे प्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे़