शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

‘त्या’ म्हणाल्या, ‘मुलीसारखी तू माझ्या, पुरवीन सारे कोड!

By admin | Updated: November 21, 2015 00:23 IST

‘माउली’साठी जमल्या सुवासिनी : पिलेश्वरीनगरातील शेतकरी कुटुंबात रंगलं चक्क गायीचं डोहाळजेवण - गुड न्यूज

राजीव मुळ्ये -- सातारा ‘काय खावेसे वाटते... आंबट ते गोड गोड, मुलीसारखी तू माझ्या... पुरवीन सारे कोड’ अशी डोहाळजेवणाची गाणी महिलांना तोंडपाठ असतात. मुलीसारखे लाड-कोड पुरवण्याचं आश्वासन सासू या गीतातून सुनेला देते... पण हेच आश्वासन शेतकरी घरातली सुवासिनी जेव्हा चक्क आपल्या गायीला देते, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात..!होय, सातारा शहरालगत पिलेश्वरीनगर भागातल्या शेतकरी कुटुंबात बुधवारी चक्क गायीचं डोहाळजेवण रंगलं. अजय सुधाकर इंदलकर हे कर्मानं शेतकरी अन धर्मानं वारकरी. या संप्रदायात देशी गायीचं माहात्म्य मोठं. साडेनऊ वर्षांपूवी त्यांनी पंढरपूरला अभिषेक केला. देशी गायीची ओढ तेव्हाच निर्माण झाली आणि बंडातात्या कऱ्हाडकर यांच्याकडून त्यांनी एक भाकड गाय आणली. तिला औषधपाणी केल्यावर ती गाभण राहिली. पण ती लहान मुलांना मारायला लागल्यामुळं वेळे येथील जैन मंदिराला देऊन टाकली.नंतर कोरेगावमधून ही गाय आणली. ‘माउली’ तिचं नाव. आता ती तिसऱ्यांदा गाभण आहे. इंदलकर यांच्या पत्नी हर्षदा यांनी या गायीचं डोहाळजेवण करण्याची कल्पना मांडली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि करंजे, पिलेश्वरीनगर भागातल्या दोन-अडीचशे महिलांच्या उपस्थितीत बुधवारी थाटामाटात हे डोहाळजेवण झालंही! एखाद्या गर्भवती महिलेचे लाड-कोड पुरवावेत, तसे ‘माउली’चे पुरवले गेले. तिचं औक्षण केलं. तिच्यासमोर एका घमेल्यात बर्फी, दुसऱ्यात पेढे ठेवले. पाच प्रकारची फळं ठेवली. डोहाळजेवणात जसे महिलेला फुलांचे बाजूबंद घालतात, तसे ‘माउली’च्या पुढच्या पायात घातले. डोईवर फुलांचं बाशिंग. सर्व महिलांना भोजन. नंतर भजन-कीर्तन. दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत हा सोहळा सुरू होता. कार्तिक महिन्यात नव्या साडीची घडी मोडण्यापूर्वी ती गायीच्या अंगावर घालण्याची प्रथा आहे. डोहाळजेवणाच्या निमित्तानं ‘माउली’च्या अंगावर हिरवी साडी घालण्यात आली. वसुबारशादिवशीही ‘माउली’ची पिलेश्वरीनगरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती आणि अन्नदानही करण्यात आलं होतं.वसाहतीत बांधलं विठ्ठल मंदिरचार वर्षांपूर्वी पिलेश्वरीनगरात इंदलकर यांनी कुणाकडून एक पैसा न घेता विठ्ठल मंदिर बांधलंय. त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांचे बंधू अमोल यांनी पन्नास हजाराचा चेक दिला. ते गुजरातमध्ये लष्करी सेवेत आहेत. बांधकाम सुरू झालं. नंतर बंधूंनी पुन्हा दहा हजार दिले. उसाचे पैसे आल्यावर सोसायटीचं कर्ज परत करून उरलेल्या रकमेत बांधकाम पूर्ण करण्यात आलं. हे मंदिर आणि महाप्रसाद याचा खर्च दोन लाख पासष्ट हजारांवर पोहोचला.कुटुंबात सात्त्विक वातावरणअजय इंदलकर यांना संजना आणि अक्षता या दोन मुली आणि अथर्व हा मुलगा. बंधू अमोल आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांना समृद्धी आणि आदित्य अशी दोन अपत्यं. अजय यांनी मुलगा अथर्व याला सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी मेढ्याजवळ अंबेघरला पाठवलंय. आई सुमन यांच्यासह सर्वांनी घरात सात्त्विक वातावरण राखलंय. याचा परिपाक म्हणून शाहूपुरीतले पशुचिकित्सक गर्गे हे त्यांच्या गायीला विनामूल्य उपचार पुरवतात.