शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

वाढदिवशीच तिला मृत्यूने कवटाळले !

By admin | Updated: May 3, 2014 14:34 IST

इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

- भरधाव डंपरची दुचाकीला धडक, विद्यार्थिनी जागीच ठार ; डंपरचालकास अटक कोल्हापूर : ती गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीवरून मैत्रिणीसमवेत घरी निघाली होती आणि त्यात तिचा आज (शुक्रवार) वाढदिवस... तिच्या चेहर्‍यावर आनंद व हास्याचे फवारे होते... तिची दुचाकी गाडी शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून थेट टाकाळ्याकडे येत होती... कडक ऊन अन् वेळ दुपारी एक वाजण्याची... याच सुमारास अनुकामाणिका मंदिराजवळ पाठीमागून भरधाव येणार्‍या डंपरची तिच्या दुचाकीला जोराची धडक बसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.काजल राजेंद्र पाटील (वय १८, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे तिचे नाव. तिच्या मृत्यूची वार्ता कळताच सीपीआर रुग्णालयाच्या आवारात तिच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या अपघातप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित डंपरचालक बाहुबली जिन्नाप्पा शेट्याबोळ (३५, रा. मणेर मळा, गणेश कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याला अटक केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, काजल पाटील व तिची मैत्रीण (नाव समजू शकले नाही) दुचाकीवरून शिवाजी विद्यापीठाकडून टाकाळ्याकडे येत होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव येणार्‍या डंपरने काजलच्या गाडीला जोराची धडक दिली. यात ती रस्त्यावर पडून डंपरखाली सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक तेथून पसार झाला. राजारामपुरी पोलिसांनी पंचनामा करून काजलची गाडी व डंपर पोलीस ठाण्यास आणला. यानंतर हा प्रकार तिच्या घरच्यांना कळविला. (प्रतिनिधी) चौकट : डंपरवर दगडफेक...घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे संतप्त जमावाने अपघातानंतर डंपरवर जोरदार दगडफेक केली. यावेळी पोलीस येताच जमाव शांत झाला.वाढदिवसाचा बेत! मृत काजलचे वडील सत्यशोधक सहकारी बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करतात. ते मूळ नंदगाव (ता. करवीर) येथील आहेत. त्यांना पत्नी, दोन मुली आहेत. त्यांच्या पहिल्या मुलगीचा विवाह झाला आहे. त्यामुळे सानेगुरुजी वसाहत परिसरातील घरामध्ये तिघेजण राहात होते. आज (शुक्रवार) वाढदिवस अन् परीक्षेचा शेवटचा पेपर होता. तिचा सायंकाळी वाढदिवस करण्याचा बेत तिच्या कुटुंबीयांनी आखला होता. मात्र, वाढदिवस होण्याअगोदरच तिच्यावर काळाने झडप घातली.फोटो : ०२ कोल-काजल पाटीलफोटो : ०२ कोल-सीपीआर ०१ व ०२ कोल्हापुरात शुक्रवारी दुचाकीच्या डंपरने दिलेल्या जोराच्या धडकेत सानेगुरुजी वसाहत परिसरातील काजल पाटील या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर काजलच्या आई, वडील व बहिणीने सीपीआर रुग्णालयात एकच हंबरडा फोडला होता.फोटो : ०२ कोल-डंपर तोडफोडटाकाळा परिसरात अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केली.फोटो : ०२ कोल- बाहुबली शेटेबोळ (छाया : दीपक जाधव)