शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

डोळ्यांपुढील कृष्णविवर तिने व्यापून टाकले स्वरांनी!

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

पीयूषाची अमृतवाणी : अंध बालशाहीर म्हणून नवव्या वर्षी मिळविला नावलौकिक; चौदा वर्षांच्या दादाचीही चिमुकलीला कार्यक्रमात मनापासून साथसंगत

प्रदीप यादव - सातारा  -निसर्गाने तिच्या डोळ्यांसमोर उभे केलेले प्रचंड कृष्णविवर तिने आपल्या पहाडी आवाजाने आणि जादुई सूरांनी भरून काढले आहे. अभंग असो वा पोवाडा तिचा स्वर हलत नाही आणि ठेकाही चुकत नाही, चुकतो तो ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठोका.-कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावातील सुनील आणि रेखा भोसले या दाम्पत्याची पीयूषा ही नऊ वर्षांची मुलगी. जन्मत:च अंध; पण कुहू कुहू गाणाऱ्या कोकिळेसारखा गोड गळा पीयूला लाभला आहे. नियतीनं पीयूषाची दृष्टी हिरावून घेतली असली तरी निसर्गानं तिला गोड गळ्याची देणगी दिली आहे. ती जेव्हा अभंग गाते तेव्हा ऐकणारे भक्तिरसात न्हाऊन निघतात आणि जेव्हा पोवाडा सादर करते तेव्हा त्यातील वीररसाने अंगावर शहारे उभे राहतात. अवघ्या नवव्या वर्षात तिला गायनाची असलेली जाण आणि भानही आचंबित करणारे आहे.सुनील भोसले हे नोकरीनिमित्त ते सातऱ्यात स्थायिक झाले आहेत. आपल्या गोड गळ्याच्या पीयूबाबत ते सांगतात, ‘पीयू जन्मत:च दृष्टिहीन. तिचा जन्म झाला तेव्हा खूप वाईट वाटले. देवानं कुठल्या जन्माची शिक्षा आम्हाला दिली, आमच्याच नशिबी असं अपत्य का यावं, अशा अनेक तऱ्हेच्या प्रश्नांनी डोक्यात काहूर माजविलेलं. पण जे नशिबी आलं त्याचा स्वीकार तर केला पाहिजे, या विचारानं आम्ही तिचं संगोपन केलं. तीन-चार वर्षांची असतानाच ती बडबड गीते म्हणायची. एवढंच काय तर ती गाता-गाता स्वत:चं नाव गाण्यात लीलया मिसळायची. घरात गायनाचा वारसा नसताना निसर्गानंच तिला ही देणगी दिली आहे, याची तेव्हा जाणीव झाली आणि तिला संगीताचं शिक्षण द्यायचं ठरविलं. साताऱ्यातील कृष्णानगर येथील ज्ञानभारती प्राथमिक शाळेत ती चौथीत शिकत आहे. तर संगीत शिक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्याकडे ती शास्त्रीय संगाताचे धडे घेत आहे. क्लासमध्ये शिकविलेले रेकॉर्डिंग ऐकून तिची संगीताची तालीम सुरू आहे. शालेय शिक्षणातही ती उजवी ठरत आहे. पोवाडा गायन हा अवघड गायनप्रकार पियूषानं कसा अवगत केला याबाबत सुनील भोसले यांनी एक किस्सा सांगितला. गेल्या वर्षी दिवाळीत प्रतापगडावर फिरायला गेलो तेव्हा गडावर शाहीर बाबासाहेब देशमुख यांचे पोवाडे रेकॉर्डवर वाजत होते. पीयू ते तन्मयतेनं ऐकत कानात साठवत होती. तिने मला पोवाड्याची सीडी ध्यायला लावली. त्यातील ‘गड आला पण सिंह गेला आणि प्रतापगडचा रणसंग्राम’ हे पोवाडे तिचे नुसतेच तोंडपाठ केले नाहीत तर अचूक शब्दफेक, स्वरांवरील पकड, त्यातील चढ-उतार, स्पष्टता आणि एकूणच तिचे सादरीकरण एवढे प्रभावी होते की अंगावर रोमांच उभे राहतात, अशा प्रतिक्रिया मिळत असल्याचे भोसले यांनी सांगितले. एक वर्षात तिचे साताऱ्यासह पुणे, ठाणे येथे २१ कार्यक्रम झाले. सातारा आकाशवाणीवरही गायनाची संधी तिला मिळाली. प्रत्येक ठिकाणी तिचा होत असलेला गौरव डोळ्यांच्या कडा ओलावत होता. पीयूला तिचा मोठा भाऊ अभिजित साथसंगत करतो. पीयूनं जे साधलं आहे ते आयुष्यात आम्हाला कधीच जमले नसते. तिनं नवव्या वर्षीच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज आम्हाला ‘पीयूषाचे आई-बाबा’ या नावानेच लोक ओळखतात. नऊ वर्षांपूर्वी जो प्रश्न पडला होता की, ‘आमच्याच नशिबी असं अपत्य का?, याचं उत्तर आता मिळाल्यासारखं वाटतं.गावाने केला सन्मानआपल्या गावच्या पीयूषानं अवघ्या नवव्या वर्षांत आपल्या गायनानं सर्वांना मोहिनी घातली आहे. वीररसाने भरलेले शब्द आणि डफावर पडणारी थाप श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेते, याचा अभिमान शिरंबे गावाला आहे. बालवयात बहरलेल्या तिच्या गायकीचा सन्मान म्हणून गावोने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बालशाहीर पीयूषाला मानपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला. यावेळी नामदेव भोसले, कॅ. महादेव भोसले, लक्ष्मण सुतार, परशुराम सुतार, मुख्याध्यापक अमितकुमार शेलार, ग्रामस्थ उपस्थित होते.संगीत क्षेत्रात मोठं व्हायचंयमला गाणं खूप आवडतं. आई-बाबांनीही मी गाणं शिकावं म्हणून मला प्रोत्साहन दिलं. सध्या मी संगीताची पहिली परीक्षा दिली आहे. सर्व परीक्षा देऊन याच क्षेत्रात नाव मिळविणार आहे.- पीयूषा भोसले