शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा!

By admin | Updated: November 16, 2014 00:02 IST

एनकूळमध्ये चर्चा : गाव बारमाही बागायत करण्याचा निर्धार

वडूज : एनकूळ गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालयात खासदार शरद पवार यांनी या गावच्या विकासाचा आराखडा ठरविला. शाळेतील दहावीच्या वर्गात बसून शनिवारी त्यांनी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या दीड तासाच्या कालावधीत गावच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली.खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्ष टी. आर. गारळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा नियोजन अधिकारी एच. एल. माळी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी राहुल देसाई आदींच्या उपस्थितीत पवारांनी गावच्याविकासाचा निर्धार केला. एनकूळ ग्रामस्थांनी चौकामध्ये पवारांचे जंगी स्वागत करुन सत्कार केला. दरम्यान, शनिवार असल्याने सकाळी साडेसात साडेअकरापर्यंत शाळा होती. पण या बैठकीमुळे सकाळी १0 वाजताच शाळा सोडण्यात आली होती. मुले ग्राऊंडवर थांबली होती. बैठक झाल्यानंतर पवारांसह अधिकारी व पदाधिकारी दहावीच्या वर्गाबाहेर आले. त्यावेळी महर्षी शिंदे विद्यालयातील मुलींनी स्वागत गीत गायले. त्यानंतर पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावच्या विकासाबाबत काही सूचना असतील तर त्या माझ्याकडे करा, असेही त्यांनी ग्रामस्थांना सुचविले. वाहनचालकासोबत एकटेच एनकूळमध्ये दाखल झालेले खासदार शरद पवार खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासोबत वडूजला गेले. वडूजच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये भोजन करुन ते पुण्याकडे रवाना झाले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधला. एनकूळचे सरपंच भाऊसाहेब खाडे, उपसरपंच सुदाम तुपे, ग्रामसेवक ए.पी.खाडे, ग्रामपंचायत सदस्य दया खरमाटे, विलास खरमाटे आदी सदस्य उपस्थित होते.पाय ठेवायला जागा नव्हती३000 लोकसंख्या असलेले एनकूळ हे गाव २00९ मध्ये निर्मल ग्राम ठरले होते. विकासाचा आणि पाण्याचा दुष्काळ असला तरी बुध्दीजीवी वर्गाचा सुकाळ या गावात आहे. गावचे सुपुत्र व मध्यप्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. सुदाम खाडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन गाव दत्तक घेतल्याबद्दल आभार मानले होते. पवारांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ शाळेच्या मैदानात दाखल झाले होते.